मसुरे /-

रणजित राणे क्रीडा व सामाजिक विकास मंडळ, आवास, अलिबाग, रायगड आयोजित पहिल्या रायगड जिल्हा डायरेक्ट व्हाॅलीबाॅल असोशिएशन अजिंक्यपद स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगुर्ल्याचे सुपुत्र आंतरराष्ट्रीय शुटिंगबाॅल पंच अशोक दाभोलकर ( दाभोली) व राष्ट्रीय पंच शशिकांत गवंडे ह्याना विशेष सन्मानित करण्यात आले.

नुकत्याच प्रकाशित झालेल्या राज्य असोशिएशन आचारसंहीता व नियमावलीच्या अशोक दाभोलकरांच्या हस्तलिखित डायरीचा विशेष आधार घेत ही पुस्तिका तयार करण्यात आली होती व विशेषज्ञ म्हणून पुस्तिकेत आपले विशेष मत व शुभेच्छा देण्याचा बहुमान देण्यात आला होता.
गेली अर्धदशक खेळाडू, आयोजक, पंच, प्रशिक्षक म्हणून आपले योगदान देणार्‍या व मा.डाॅ. प्रकाश बाबा आमटे व आदरणीय सिंधुताई सकपाळे ह्यांचे हातून सन्मानित अशोक दाभोलकर व शशि गवंडे ह्याना सन्मानित करण्यात आले आहे. नुकत्याच कर्जत, रायगड येथे झालेल्या राज्य संघटना आयोजित राज्य पंच शिबिर व दि. ३१ जानेवारी रोजी झालेल्या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत पंच व खेळाडूना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना खास आमंत्रित करण्यात आले होते त्याचवेळी त्यांना श्री. गणेश राणे व श्री. रणजित राणे- आयोजन प्रमुख यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

ह्या कार्यक्रमाला शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त क्रिडा महर्षी श्री. नथुराम पाटीळ, आमदार श्री. नरेन्द्रशेट दळवी, अॅड. जयंत चौलकर, राज्य संघटनेकडून राज्य संघटना अध्यक्ष प्रा. डि. बी. साळुंके, सचिव प्रा. दिपक मोकलसर, उपाध्यक्ष सुरेशचंद्र बाविस्कर, खजिनदार अंकुश पाठक, तांत्रिक कमिटी प्रमुख सचिन पाटील, शरद कदम आदी मान्यवर आवर्जुन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page