कुडाळ /-

भाजपचे राष्ट्रीय कार्यवाह तसेच आंध्रप्रदेश प्रभारी मा.सुनील देवधर यांनी सोमवार दि.१/०२/२0२१ रोजी पाट हायस्कूलला भेट दिली.खाजगी कामानिमित्त गोवा येथे जात असताना आपल्या व्यस्त कामकाजातून वेळ काढून त्यांनी पाट हायस्कूल येथील अटल टिंकरिंग लॕब ची पाहणी केली.मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये घडत असलेल्या नवनिर्मितीची प्रत्यक्ष अनुभूती त्यांनी घेतली व विद्यालयाने केलेल्या प्रगतीबद्दल प्रशंसोद्गार काढले .

कुडाळ तालुक्यातील एस.एल.देसाई विद्यालय, पाट या प्रशालेस केंद्रशासनाच्या निती आयोगाकडून अटल टिंकरिंग लॕब उपलब्ध झाली आहे.इ.८ ते १२ वी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थी या प्रयोगशाळेत इलेक्ट्रॉनिक्स व रोबोटीक तंत्रज्ञान वापरून प्रतिकृती बनविताना पाहून त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.मा.पंतप्रधानाचे आत्मनिर्भरतेचं व्हिजन ग्रामीण भागातील विद्यालयांमधून आकारास येण्यास या ATL लॕब मोलाचं कार्य करीत आहे असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले .यावेळी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या साऊंड ब्लू – टूथ कंट्रोल बल्ब ,अग्निशामक ,ब्लाईंडर्स स्टीक ,रोबोट ,अॕटोमॕटिक हँड सॕनिटायझर या प्रतिकृतींचे सादरीकरण केले गेले.

आंदुर्ले गावचे सुपूत्र व प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री.अशोक तेंडोलकर यांच्या आग्रहाखातर मा.देवधर यांनी प्रशालेस भेट दिली.श्री.अशोक तेंडोलकर हे अंधेरी येथे वास्तव्यास असताना तेथील रा.स्व.संघ शाखेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते तेव्हा त्याठिकाणी मा.सुनिल देवधर यांच्याशी त्यांचे ऋणानुबंध जुळले .वेळेअभावी थांबता न आल्याने आपण विद्यालयास पुन्हा आवर्जून भेट देण्याची सदिच्छा मा.सुनिल देवधर यांनी व्यक्त केली.

यावेळी संस्था कार्याध्यक्ष श्री.रेडकर गुरूजी ,कार्यवाह श्री.दिगंबर सामंत ,सुधीर ठाकूर ,मुख्याध्यापक शामराव कोरे व प्रशालेतील सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page