सिंधुदुर्गनगरी /-

‘इन्स्पायर सिंधुदुर्ग’ अंतर्गत ओरोस येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेली सायकल मॅरेथॉन उत्स्फूर्त प्रतिसादात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यामध्ये यजमान सिंयुदुर्गसह उर्वरित महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील मिळून एकूण ४१५ सायकलपटूंनी सहभाग नोंदवला, २५, ५० आणि १०० किमी अशा तीन गटात पार पडलेल्या या स्पर्धेत पांच वर्षाच्या मुलापासून ते आमदार देमव नाईक जागतिक विक्रमवीर सायकलपटू महेंद्र महाजन त्याचप्रमाणे पुरुष व महिला सायकलपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

जिल्ह्यातील तरुणांना सदृढ आरोग्यासाठी सायकलिंगकरीता प्रेरित करण्यासाठी रेन्बो रायडर्स, ब्युटीज ऑन व्हिल्स, कुडाळ सायकल क्लब आणि पॉज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इन्स्पायर सिंधुदुर्ग या नावाने या मॅरेवॉनचे आयोजन करण्यात आले होते.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते झेंडा दाखदून या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी आणि युवा नेते आनंद उर्फ भाई सावंत यांच्या हस्ते सायकलपटूंना पदके व प्रशस्तीपत्रके मुंबई-गोवा महामार्गावर ही प्रदान करण्यात आली.’सायकल मॅरेथॉन’ पार पडली.
स्पर्धेचा शुभारंभ जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी,आंतरराष्ट्रीय सायकलपटू व एव्हरेस्टवीर महेंद्र महाजन, आमदार वैभव नाईक, आनंद उर्फ भाई सावंत, इन्स्पायर सिंधुदुर्गचे अध्यक्ष डॉ. बापू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.जिल्हाधिकारी म्हणाल्या, सायकल स्पर्धेचा हा उपक्रम अतिशय चांगला असून त्याला मिळालेला प्रतिसाद हा खरोखरच लक्षवेधी आहे.

विशेष म्हणजे आमदार वैभव नाईक हे २५ किमी गटात सहभागी झाले होते. त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सायकलिंग करीत नि्धारित वेळेपूर्वीच स्पर्धा पूर्ण करून पदक प्राप्त केले, या स्पर्धेत आर्यन महादेव भिसे (वय ५). सुकळवाड व स्वरा उल्हास पालय (वय ५), ओरोस है दोन सायकलपटू
स्पर्धेतील सर्वात लहान सायकलपटू ठरले. त्यांनी २५ किमी अंतर सहज पार करीत पदक प्राप्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page