कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात काल बुधवारी उशिरा मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाचे ०८ सक्रिय रुग्ण सापडले आहेत,हे ०८ रुग्ण कुडाळ तालुक्यातील ओरोस येथील ०५,वर्दे येथील ०१,कुडाळ शहर ०१ ,रांगणा तुळसुली ०१ असे आहेत.अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.

तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण ५८८ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ५८२ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत. तर सध्या ०६ कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण १४२० एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले १३४३ आणि सक्रिय रुग्ण संख्या ही ३२ आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे ०४ आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात ४१ रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page