मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिल्या शुभेच्छा…

महाराष्ट्राच्या या शिव कालीन लोककलेकडे राज्य सरकारनेही लक्ष देण्याची मनसेने व्यक्त केली भावना

कुडाळ /-

कोकणातील ‘कटपुतली बाहुल्यांचा खेळ’ या पारंपरिक लोककलेचे मागील 50 वर्षे जतन करून तिला नवसंजीवनी देणार्‍या पिंगुळी येथील ठाकर समाजातील कलातपस्वी श्री परशुराम गंगावणे यांचा भारत सरकारने मानाचा “पद्मश्री” पुरस्कार जाहीर केला.त्या त्या अनुषंगाने मनसेच्या परशुराम उपरकर यांच्या उपस्थित शिष्टमंडळाने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी परशुराम गंगावणे यांनी आपल्या कलेच्या माध्यमातील तपश्चर्येने सिंधुदुर्ग जिल्ह्याला अजून एक प्रकारे देशात ओळख निर्माण करून दिली त्याबद्दल मनसे पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. मनसेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे हे एक कलाप्रेमी व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण देशात परिचित आहेत.त्यामुळे राजसाहेबांच्या आगामी सिंधुदुर्ग दौऱ्यात पारंपरिक लोककला जपणाऱ्या ठाकर समाजाच्या म्युझियम या भेट देण्यासाठी आग्रही राहू व मनसेच्या माध्यमातून या कळसूत्री बाहुल्यांच्या लोककलेला महाराष्ट्र शासनाने विशेष प्रोत्साहन देण्यासंबंधी मंत्रालय पातळीवर पक्षाच्या माध्यमातून पाठपुरावा करू अशी ग्वाही यावेळी उपरकर यांनी दिली.यावेळी मनसेचे जिल्हा सचिव बाळा पावसकर, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, कुडाळ सचिव राजेश टंगसाळी, अणाव सरपंच आपा मांजरेकर, संतोष सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page