असोसिएशनचे अध्यक्ष सागर सागर तेली यांची कुडाळ येथे पत्रकार परिषदेत माहिती..

कुडाळ /-

जीएसटी कायद्याच्या जाचक तरतुदी विरोधात दि. 29 जानेवारी रोजी जीएसटी प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने वस्तू व सेवा कर कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सकाळी १० वाजता निषेध नोंदविण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष सागर तेली यांनी दिली. तसेच जीएसटी कायदा टाटा, रिलायन्स, बिर्ला या सारख्या मोठ्या उद्योजकांना सोपा आहे तर लहान व्यापारी, उद्योजकांना त्रासदायक आहे असे ही त्यांनी सांगितले.

कुडाळ एमआयडीसीच्या शासकीय विश्रामगृहात या पत्रकार परिषदेचे आयोजन जीएसटी प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी कुडाळ तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय भोगटे, सदस्य, उपाध्यक्ष हेमंत वालकर, सचिव प्रमोद जांभेकर, खजिनदार जयंती कुलकर्णी, सदानंद सामंत, विलास देऊलकर सी ए अशोक सारंग, गिरीश तिरोडकर, नागेश नाईक, शैलेश मुंड्ये, विनायक जांभेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सागर तेली यांनी सांगितले की, वेस्टर्न महाराष्ट्र टॅक्स प्रक्टिशर्सन असोसिएशन, पुणे, यांनी जीएसटी कायद्याच्या जाचक तरतुदी विरोधात पुकारलेल्या निषेधाच्या आवाहनास संपूर्ण भारतभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या निषेधा मध्ये, जीएसटी प्रॅक्टिशर्सन असोसिएशन, सिंधुदर्ग यांनी सहभाग घेतलेला आहे. जीएसटी प्रक्टिशर्सन असोसिएशन, सिंधुदुर्ग हि सिंधुदुर्ग जिल्हातील कर व्यावसायिक सदस्याची असोसिएशन असून ती जीएसटी प्रक्टिशर्सन असोसिएशन, महाराष्ट्र याच्याशी सलंग्न आहे.

जुलै 2017 पासुन जीएसटी प्रणाली लागु केल्यापासून संगणक प्रणालीची वापर मोठ्या प्रमाणात वाढला याचा नाहक त्रास छोट्या उद्योजक, व्यापारी यांना सहन करावा लागतो. या कायद्यात अनेक अटी शर्ती, तज्ञ सापडत नाही, चुकीची माहीती सादर झाल्यास पुन्हा बदल केला जात नाही, कधीकधी रजिस्ट्रेशन रद्द केले जाते, या सर्वांचा व्यापार्यांना त्रास होतो. लेट फी मोठ्या प्रमाणात लावली जाते यातुन सरकारने मोठ्या प्रमाणात रक्कम जमा केली आहे, कायदा चांगला आहे पण छोट्या व्यापार्यांना परवडणारा नाही असे मत तेली यांनी व्यक्त केले. मुंबई विक्रीकर कायदा, वॅट सोपं होते मात्र हे कळायच्या अगोदरच जीएसटी कायदा आला. यात जीएसटी कठीण आहे असे ही त्यांनी सांगितले.

यावेळी संजय भोगटे यांनी सांगितले की, जीएसटी संदर्भातील निषेधाच्या भुमिकेला व्यापारी महासंघाचा पुर्ण पांठिबा असल्याचे जाहीर केले.
यावेळी सारंग यांनी सांगितले की, जीएसटी सुरू झाल्यापासून 1हजार 500 दिवस झाले. तेवढीच नवनवीन 1हजार 500 परिपत्रके आली आहेत. त्यांमुळे सरकारने काय म्हणून कायदा आणला असा प्रश्न पडतो. सरकारला दया माया काहीच नाही. सामान्यांच्या आवाक्यात हा कायदा सोपा नाही. अधिकारी याचा फायदा घेत सामान्य नागरिक, व्यापार्यांना लुटतात. सिंधुदुर्ग, सावंतवाडी येथील कार्यालयात ही प्रश्न समस्यांबाबत माहिती दिली जात नाही असे सांगितले.

कर कायदे लागू केले जात आहेत त्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यासाठी, पश्चिम महाराष्ट्र कर प्रक्टिशनर्स असोसिएशनने २९ जानेवारी महात्मा गाधीजी याच्या पुण्यतिथी निमित्त निषेध पुकारला आहे. त्याला देश भरातुन प्रतिसाद मिळत आहे. अनेक व्यापारी संघटना, कर सल्लागार व सनदी लेखापाल याच्या विविध असोसिएशन उत्स्फूर्तपणे या निषेधात सामील होत असुन जीएसटी कायद्याच्या जाचक तरतुदी विरोधात निषेध नोंदवित मागण्यांचे निवेदन ही देण्यात येणार आहे.यावेळी आमदार वैभव नाईक यांना ही जीएसटी कायद्याच्या जाचक तरतुदी विरोधात या बाबत संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page