कुडाळ /-

कुडाळ पासून १२ किलोमीटर वर असलेल्या श्री देव कासारकाटा महापुरुष देवस्थान हे नवसाला पावणारं देवस्थान म्हणुन प्रसिद्ध आहे. येथे वर्षाला लाखो भाविक नवस करण्यासाठी दाखल होतात.आणि तो नवस पुर्ण झाल्यावर त्या ठिकाणी जेवण बनवुन नैवेद्य दाखवला जातो अशी ईथे प्रथा आहे. या ठिकाणी पार्ट्या पण राजरोस पणे चालु असतात.पण यातुन निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट न लावता ते परस्पर निघुन जातात. विशेष करुन या कचऱ्यात प्लास्टिक पत्रावळी, द्रोण, ग्लास पाण्याच्या बाटल्या , मद्याच्या बाटल्या ईथेच वर्षानुवर्षे तशाच पडुन असतात. यामुळे निसर्गाचा समतोल बिघडतो, याचं गांभीर्य लक्षात घेऊन सिंधुदुर्गात काम करत असलेली कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यु फोरम ,सिंधुदुर्ग या संस्थेने पुढाकार घेऊन हा परिसर ७२व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत स्वच्छ केला.

या मोहिमेत अनिल गावडे, आनंद बांबार्डेकर, वैभव अमृस्कर, महेश राऊळ , नंदु कुपकर ,सिध्देश ठाकुर , विजय कदम , विष्णु मसगे , दिवाकर बांबर्डेकर, दिपक दुतोंडकर आदि उपस्थित होते.

या मोहिमेस मालवण तालुक्यातील प्रसिद्ध वकिल रुपेश परुळेकर यांनी रेस्क्यु टीमचं सामाजिक कार्य बघुन विशेष सहकार्य करुन प्रोत्साहन वाढवले. मागिल वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त ओरस मुख्यालय परिसरातील देशाची शान असणारे हाँकर हंटर विमान आणि परिसर या संस्थेने स्वच्छ केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page