वेंगुर्ला /-
तालुक्यातील रेडी येथील टाटा मेटॅलिक प्रकल्प बंद झाल्यापासून रेडीप्रमाणेच संपूर्ण शिरोडा पंचक्रोशीतील बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे.सदर प्रकल्पावर अवलंबून असणारे शिरोडा पंचक्रोशीतील बरेचसे सर्वच व्यवसाय कोलमडलेले असून शिरोडा, आरोंदा सारख्या बाजारपेठांवर ही याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. रेडी येथील बंद पडलेल्या टाटा मेटॅलिक सारख्या ठिकाणी चांगला प्रकल्प आणून येथील बेरोजगार जे गोवा सारख्या परराज्यात जोखीम पत्करून नोकरी साठी धडपड करत आहेत.उच्च शिक्षण, डिप्लोमा,डिग्रीप्राप्त असतानाही चरितार्थ चालविण्यासाठी दिवसा मजुरी वर काम करत आहेत.त्यांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून योग्य न्याय मिळण्याची आवश्यकता असल्याने आम्ही शिरोडा वासीयांतर्फे २६ जानेवारी २०२१ रोजी रेडी ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी जाहीर केलेल्या उपोषण आंदोलनास पाठिंबा जाहीर करत आहोत. त्याचप्रमाणे शिरोडा वेळागर येथील भूमीपुत्रांवर पर्यटन विकासा च्या नावाखाली शासना कडून कुठल्याही प्रकारचा अन्याय होत असल्यास स्थानिक भूमीपुत्रांसोबत कायम ठाम उभे राहणार आहोत, असे शिरोडा ग्रामपंचायत सरपंच मनोज उगवेकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page