वेंगुर्ला /-

वेळागर संघर्ष समितीच्या वतीने २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रातिनिधिक स्वरूपात तर वेळागर येथे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती वेळागर संघर्ष समितीचे नेते जयप्रकाश चमणकर व वेळागर संघर्ष समितीचे अध्यक्ष आजू आमरे यांनी आज वेळागर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

वेळागर संघर्ष समितीचे नेते जयप्रकाश चमणकर,
,वेळागर संघर्ष समितीचे अध्यक्ष आजू आमरे,मदन आमरे,समिर भगत,रुझारियो अल्फान्सो,आग्नेल सोज, नॅल्सन सोज,रुपेश तारी, संतान फर्नांडीस,शेखर भगत,आनंद आमरे,सुधीर भगत आदी वेळागर संघर्ष समितीचे पदाधिकारी,निलेश चमणकर, कायदेशीर सल्लागार श्वेता चमणकर आदी उपस्थित होते.
यावेळी वेळागर येथे बोलताना जयप्रकाश चमणकर म्हणाले की,१९९२ साली एमटीडीसी मार्फत ताज प्रकल्पासाठी दहा एकर जमीन मागण्यात आली होती.त्यानंतर ताज प्रकल्पामध्ये स्थानिकांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन देत साठ एकर जमिनीची मागणी करण्यात आली होती व साठ एकर जमीन भूमिपुत्रांनी शासनास देण्यात आली.मात्र त्यानंतर ताज गृपतर्फे शंभर एकर जमिनीची मागणी करण्यात आली.तसेच सीआरझेड चे कारण सांगून सर्व्हे नं.३९ गावठान जागेचीही मागणी करण्यात आली.त्यास स्थानिकांनी विरोध केल्याने व प्रखर आंदोलन उभारल्याने आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता.त्यानंतर मात्र शासनामार्फत पुन्हा पाहणी करून या प्रकल्पास स्थगिती देण्यात आली होती.ताज गृपने गेल्या २८ वर्षात घेतलेल्या जागेत काहीही विकास केलेला नाही.मात्र वेळागर सर्व्हे नं.३९ मध्ये स्थानिकांनी निवास न्याहारी योजना राबवून रोजगार निर्माण केला व अनेक पर्यटकाना येथे आकर्षित करून घेतले व खऱ्या अर्थाने पर्यटनास चालना दिली.

असे असतानाही राज्यशासनाने स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात न घेता ताज गृपशी नव्वद वर्षाचा करार केल्याने शासनाच्या निषेधार्थ २६ जानेवारी २०२१ प्रजासत्ताकदिनी स्थानिक भूमिपुत्र एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण छेडणार असल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली.तसेच वेळागर येथे सर्व वेळागरवासीय आपले पर्यटनसह अन्य व्यवसाय बंद ठेऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी
लाक्षणिक उपोषण
छेडणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page