पेट्रोल-डिझेल दरांच्या वाढीने सामान्य माणसाच्या जीवनावर मोठा परिणाम झाला असून त्यांची आर्थिक गणितं बिघडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सतत वाढ होत आहे. ही दरवाढ कायम असून आज मंगळवारी पेट्रोलचे दर २३ ते २५ पैशांनी वाढले असून डिझेलच्या दरातही वाढ झाली आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आज दिल्लीत पेट्रोलचा दर ८५.२० रुपये प्रति लीटर तर डिझेलचा दर ७५.३८ रुपये प्रति लीटर आहे. यासह मुंबईत ९१.८० रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर ८२. १३ रूपये प्रति लीटर आहे.

रोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर ऑईल कंपनी जाहीर करत असते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत वाढत जाते. तसेच या वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर देखील अवलंबून असतात.

कोलकात्तामध्ये पेट्रोलचा दर ८६.६३ रुपये प्रति लीटर तर डिझेलचा दर ७९.९७ रुपये प्रति लीटर आहे. यासह चेन्नईत ८७.८५ रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर ८०.६७ रूपये प्रति लीटर आहे. तसेच, नोएडात पेट्रोलचा दर ८४.८३ रुपये प्रति लीटर तर डिझेलचा दर ७५.८३ रुपये प्रति लीटर असल्याची माहिती मिळतेय.

कोल्हापूरमध्ये पेट्रोलचे दर ९१.५२ रुपये प्रति लीटर, डिझेलचे दर ८०.६० रुपये प्रति लीटर, नागपूरात पेट्रोलचे दर ९१.७६ रुपये लीटर तर डिझेल ८२.४२ रुपये लीटर, पुणे शहरात पेट्रोलचे दर ९१.४७ रुपये लीटर आणि डिझेलचे दर ८०.५८ रुपये लीटर विक्री होत आहे. यासह औरंगाबादमध्ये पेट्रोलचे दर ९२.५० रुपये लीटरसह डिझेलचे दर ८१.५२ रुपये लीटर तर नाशिकमध्ये पेट्रोलचे दर ९२.२४ रुपये लीटर आणि डिझेलचे दर ८१.२४ रुपये लीटर आणि जळगावमध्ये पेट्रोलचे दर ९२.२६ रुपये लीटर तर डिझेलचे दर ८१.६४ रुपये लीटर असे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page