७० जागांसाठी १४६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंञात बंद…

वैभववाडी /-

तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी निवडणूक प्रक्रीया शांततेत पार पडली.तालुक्यात सरासरी ६९ टक्के मतदान झाले आहे. १२ ग्रामपंचायतीतील ७० जागांसाठी १४६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.यांचे भवितव्य मतदान यंञात बंद झाले आहे.कोणतीही अनुचित घटना घडली नाही.खांबाळे येथे मतदान यंञ बंद पडल्यामुळे काहीवेळ मतदान प्रक्रीया बंद पडली होती.तातडीने दुसरे मतदान यंञ आणून मतदान सुरु करण्यात आले.तालुक्यात सर्वाधिक सोनाळी ग्रामपंचायतीसाठी ७९.४७ टक्के मतदान झाले आहे.तर लोरे ग्रामपंचायतीसाठी सर्वात कमी ६१ टक्के मतदान झाले आहे.
तालुक्यातील १३ ग्रामपंचायातीची निवडणूक होत आहे.यातील मांगवली ग्रामपंचायत या आधीच बिनविरोध झाल्यामुळे १२ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रीया पार पडली.यामध्ये ऐनारी, भुईबावडा, मांगवली, वेंगसर, सोनाळी, एडगाव, कोकिसरे, नाधवडे, कुंभवडे, खांबाळे, आचिर्णे, लोरे, सांगुळवाडी या ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले.सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली.सकाळपासूनच स्थानिक कार्यकर्ते मतदारांना मतदानासाठी बाहेर आणत होते.मतदानासाठी नोकरी धंदयासाठी बाहेर राहाणा-या मतदारही मतदानासाठी गावात दाखल झाले आहेत.ग्रामपंचायत मतदानात जास्तीतजास्त मतदान होते.नवमतदारांमध्ये मतदानाचा उत्साह होता.त्याचबरोबर वयोवृध्दही नातेवाईकांच्या मदतीने मतदान केंद्रावर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावतांना दिसत होते.
ग्रामपंचायत निहाय झालेले मतदान.
खांबाळे ग्रामपंचायत १३४९ पैकी ९३४ मतदान झाले.यामध्ये ४६९ पुरुष तर ४६५ स्ञीयांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.तर ६९.२३ टक्के मतदान झाले आहे.
लोरे १८०० पैकी १२१४ मतदान झाले.यामध्ये ६१८ पुरुष तर ५९६ स्ञीयांनी मतदानाचा हक्क बजावला.तर एकूण ६१.८३ टक्के मतदान झाले आहे.
आचिर्णे १३९१ पैकी ९९६ मतदान झाले.यामध्ये ४९९ पुरुष तर ४९७ स्ञीयांनी मतदान केले.तर एकूण ७१.६० टक्के मतदान झाले.
सांगुळवाडी ३३३ पैकी २४९ मतदान झाले.यामध्ये १२१ पुरुष तर १२८ स्ञीयांनी मतदान केले.तर एकूण ६८.५९ टक्के मतदान झाले आहे.
नाधवडे १४९० पैकी १०२२ मतदान झाले आहे.तर एकूण ६८.५९ टक्के मतदान झाले आहे.
कोकिसरे २१४९ पैकी १३३८ मतदान झाले आहे.तर एकूण ६२.२६ टक्के मतदान झाले.
भुईबावडा ७३० पैकी ४६३ मतदान झाले.तर एकूण ६३.४२ टक्के मतदान झाले आहे.
सोनाळी ८३३ पैकी ६६२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.तर एकूण ७९.४७ टक्के मतदान झाले आहे.
एडगाव ७१८ पैकी ५६३ मतदारांनी मतदान केले आहे.तर ७८.४१ टक्के मतदान झाले आहे.
वेंगसर २५३ पैकी १६९ मतदारांनी मतदान केले.तर एकूण ६६.७९ टक्के मतदान झाले आहे.
ऐनारी ३८७ पैकी २८० मतदारांनी मतदान केले.तर एकूण ७२.३५ टक्के मतदान झाले आहे.

कुंभवडे. एकूण ३१९ पैकी २५० मतदान झाले आहे.यामध्ये १२६ पुरुष तर १२४ स्ञीयांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.तर एकूण ७८.३६ टक्के मतदान झाले आहे.
अशा प्रकारे ७० जागांसाठी १४६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंञात बंद झाले आहे.भाजप व शिवसेना या दोन पक्षात खरी लढत होत असून दोन्ही पक्षाचे पदाधिकारी ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविण्यासाठी गेले काही दिवस प्रयत्न करीत आहेत.मतमोजणी सोमवारी होणार असून आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page