वैभववाडी/-

पुनर्वसन गावठाणात भूखंडाचा ताबा पावती देण्यात वर्षभराचा कालावधी लागला, प्रकल्प अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयात भूखंडाचा ताबा पावती साठी हेलपाटे मारले परंतु प्रकल्पग्रस्त शांताराम नागप यांच्याकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. धरणाच्या पाण्यात बुडालेले घर, जमीन व घराचे योग्य प्रकारे न केलेले मूल्यांकन या नैराश्यातून विष प्राशन करून आत्महत्या केलेले शांताराम नागप यांच्याआत्महत्येस जबाबदार धरून प्रकल्प अधिकारी राजन डवरी संबंधित अधिकारी व तथाकथित धरण समितीच्या पुढार्‍यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्थाच्या अस्तीत्वाचा संघटनेच्या वतीने सहाय्यक पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य मनोज पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे 14 जानेवारी 2019 रोजी निवेदनाद्वारे केली आहे. 6 जानेवारी 2021 रोजी प्रकल्पग्रस्त शांताराम नागप यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.त्यांना वैभववाडी रुग्णालयात दाखल केले असता आत्महत्या करण्याचे कारण त्यांनी आपल्या जबाबात वैभववाडी पोलिसांना दिले आहे. यानंतर वैभववाडी पोलिसांना कार्यकारी अभियंता राजन डोरी तात्काळ भेटून गेले.हे प्रकरण आठ दिवसानंतर समाज माध्यमांसमोर आले होते. धक्कादायक असलेल्या या प्रकरणातील पीडित शांताराम नागप यांना सिंधुदुर्ग ,कोल्हापूर,, येथील उपचारानंतर केईएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल दाखल करण्यात आले होते .13 जानेवारी 2021 रोजी मृत्यूशी झुंज देत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. शांताराम नागप यांच्या निवासी भूखंडाचा ताबा पावती न मिळाल्याने त्यांच्या घरात वीज वितरण कंपनी लाईट देत नव्हती संबंधित अधिकारी कोणच्या सांगण्यावरून प्रकल्पग्रस्त शांताराम नागप यांना ताबा पावती देत नव्हते.वर्षभराचा कालावधी लोटला तरी त्यांना ताबा पावती न देण्याचे कारण काय ? अरुणा प्रकल्पग्रस्तांनी संघर्ष समितीचे नेतृत्व स्वीकारले होते. परंतु त्यांनी प्रकल्पग्रस्तांचा विश्वासघात करून सौदेबाजी केली. व घळभरणी करण्यास परवानगी दिली होती. घळभरणी करण्यास परवानगी दिली नसती तर मयत प्रकल्पग्रस्त शांताराम नागप यांच्यासह सुमारे 130 प्रकल्पग्रस्तांची राहती घरे प्रकल्पाच्या पाण्यात बुडाली नसती.व शांताराम नागप यांच्यावर आत्महत्या करून जीवन संपण्याची वेळ आली नसती. असा आरोप करण्यात आला आहे.या वेळी अध्यक्ष तानाजी कांबळे, सेक्रेटरी मनोहर तळेकर, सूर्यकांत नागप, सखाराम मोरे, सुचिता चव्हाण,आरती कांबळे यांनी केला आहे . फोटो:महाराष्ट्र्र राज्य सहायक पोलीस महानिरीक्षक मनोज पाटील यांना शांताराम नागप आत्महत्या प्रकरणी निवेदन देताना तानाजी कांबळे व अन्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page