काल कुडाळ येथे स्वराज्य जननी राजमाता जिजामाता यांची जयंती साजरी करण्यात आली.स्त्री राजसत्ता प्रतिष्ठानच्या सरचिटणीस लेखाताई मेस्त्री व विश्वस्त स्नेहा दळवी यांनी माँसाहेब राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. संस्थेच्या उपाध्यक्षा सुकन्या नरसुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सरचिटणीस लेखाताई मेस्त्री यांनी ज्या प्रमाणे जिजाईने आपल्या मुलाला संस्कारातून कणखरपणा, बाणेदारपणा शिकवला त्याच पद्धतीने आतांच्या संस्कारक्षम पिढीसाठी येत्या काळात समुपदेशनाचे जाणीव जागृती चे कार्यक्रम घेण्याचा मानस व्यक्त केला.

संस्थेच्या कार्याध्यक्षा ऍड.निता सावंत-कवीटकर यांनी स्त्री राजसत्ता तर्फे महिलांसाठी भविष्यात महिलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातून संस्थे तर्फे घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली.

संस्थेच्या कोषाध्यक्ष पूनम चव्हाण यांनी ज्याप्रमाणे त्यावेळच्या प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत आपल्या शिवबामध्ये स्वराज्याच आणी साम्राज्याचं बी पेरलं त्याच प्रमाणे स्त्रियांमध्ये आर्थिक स्वावलंबनाचे धडे आपण देऊया असे प्रतिपादन केले. संस्थेच्या सह-कोषाध्यक्षा श्रेया गवंडे यांनी सूत्रसंचालन केले.

संस्थेच्या अध्यक्षा जान्हवी सावंत यांनी मातृत्वाचे प्रतीक ज्यांना आपण संबोधतो त्या स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जयंती पासून संस्थेच्या उद्देशाने प्रमाणे एक संकल्प आणि महत्वाचा उपक्रम म्हणून यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधी यांना त्या संस्थेतील लोकप्रतिनिधी म्हणून आपले अधिकार आणि कर्तव्य, कार्यालयीन कामकाज आणि योजना या बद्दल प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार. स्त्री लोकप्रतिनिधीनी सक्षमपणे स्वतःच्या निर्णय क्षमतेचा विकास करायला हवा आणि स्वतंत्र ठसा समाजकारणात आणि राजकारणात उमटवायला हवा. असे ‘स्त्री राजसत्ता प्रतिष्ठान’ च्या सभासदांची इच्छा आहे आणि त्या साठी आम्ही प्रयत्नशील राहणार असे प्रतिपादन केले.

आज च्या कार्यक्रमाला विशेष निमंत्रित म्हणून तळंबा अस्मिता फौंडेशन चे अध्यक्ष डॉ.शशांक दळवी उपस्थित होते त्यांनी अगरबत्ती व्यवसायातील स्त्रियांना असलेली संधी या बाबत मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन संस्थेच्या विश्वस्त सौ.प्रतीक्षा साटम यांनी केले. आज च्या कार्यक्रमास स्त्री राजसत्ता प्रतिष्ठान च्या विश्वस्त भारती मोरे, चित्रा धुरी, शिवानी पाटकर, श्वेता सावंत आणि सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page