आचरा /-

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेतर्फे देण्यात येणारा शिक्षणतज्ञ जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार २०२१हा कुडाळ तालुक्यातील तेंडोली आवेरे शाळेतील प्राथमिक शिक्षक ह्रदयनाथ लक्ष्मण गावडे यांना प्रदान करण्यात आला.
मराठा सांस्कृतिक हॉल कुडाळ याठिकाणी आयोजित कार्यक्रमात शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देवून त्यांना गौरविण्यात आले. यावेळी बोलताना उप शिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे म्हणाले सतत विद्यार्थी विकासासाठी धडपडत राहून विद्यार्थी, पालक व समाज यांच्यावर ह्रुदयावर अधिराज्य गाजविणा-या ह्रुदयनाथ गावडे यांची या पुरस्कारासाठी निवड करुन पुरस्काराची उंची आणखीनच वाढली. माझ्या शिक्षण विभागातील हिरे शोधून त्यांचे कौतुक करण्याचा कथामालेचा हा उपक्रम खरोकरच कौतुकास्पद असल्याचे ते म्हणले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष – शाळा तेंडोली आवेरेचे रतन धुरी यांनी भूषविले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे उपस्थित होते.या वेळी त्यांच्या सोबत केंद्रप्रमुख उदय शिरोडकर, आडवली हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक सुरेश गावकर, निवड समिती अध्यक्ष सदानंद कांबळी, साने गुरुजी कथामाला मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर, श्रीम. उर्मिला गावडे, सौ. ऋतुजा गावडे, रामचंद्र वालावलकर, चंद्रशेखर हडप,विजय चौकेकर, सौ. विशाखा चौकेकर, रामचंद्र कुबल, परशुराम गुरव, श्रीम. सुगंधा गुरव, नवनाथ भोळे, श्री. पांडुरंग कोचरेकर, गुरुनाथ ताम्हणकर, सौ. तेजल ताम्हणकर, शिवराज सावंत, सौ. शर्वरी सावंत आदी कथामाला कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच कलामंच ग्रुप, कुडाळ, रॉकस्टार डी. एड. मित्रमंडळ, गावडे कुटुंबिय आणि कुडाळ व मालवण तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवात साने गुरुजींच्या प्रतिमा पुजनाने झाली.

सत्काराला उत्तर देताना श्री. गावडे म्हणाले, कथामालेच्या अनेक नेटक्या कार्यक्रमांचा मी साक्षीदार आहे. या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली असून भविष्यातही चांगले योगदान मी नक्की देईन.कार्यक्रमाचे नियोजन कथामाला मालवणच्या कार्यकर्त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. रामचंद्र कुबल यांनी केले. आभार श्री. परशुराम गुरव यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page