कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज मंगळवारी उशिरा मिळालेल्या माहितीनुसार दिवसभरात कोरोनाच्या 03रुग्णाची नोंद झाली आहे,हे तीन रुग्ण कसाल मधील ०२, ओरोस मधील ०१असे आहेत. अशी माहिती कुडाळ तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण ५७७ एवढे कंटेन्मेट झोन झाले त्यापैकी ५६५ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत. तर सध्या १२ कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण १३६७ एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले झालेले १२९४ आणि सक्रिय रुग्ण संख्या ही २८ आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे ०४ आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात ४१ रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page