वैभववाडी/-

मुंबई ते गोवा अशी प्रवाशी वाहतूक करतांना लक्झरी बस मधून वैधानिक इशारा नसलेल्या 24 हजार रुपये किंमतीचा सिगारेटचा माल वैभववाडी पोलिसांनी जप्त केला.लक्झरी चालक व क्लिनर यांच्यावर वैभववाडी पोलिसस्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.ही घटना 9 जानेवारी रोजी सकाळी 8:30 वाजता घडली. आरोपी लक्झरी चालक इंदरसिंग हिरालालजी गुजर वय वर्षे 45 ,क्लीनर भैरु शंभु नाथ वय वर्षे 43 दोघेही राहणार मध्य प्रदेश अशी त्यांची नावे आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करूळ चेक पोस्ट येथे जिल्ह्यातील व परजिल्हातील ये-जा करणाऱ्या वाहनांची पोलीस तपासणी करत असताना मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या लक्झरी बस क्रमांक एम .एच .07-पी. 8200 या नंबरच्या लक्झरी मधून तंबाखूजन्य पदार्थ सिगारेट पाकिटावर वैधानिक इशारा नसलेल्या सिगारेटची पाकिटे आढळून आली. त्यानंतर वैभववाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई व पोलीस कॉन्स्टेबल मारुती सोनटक्के, संदीप राठोड तपासणी करत असताना सिगारेटच्या पाकिटावर वैधानिक इशारा नसल्याचे आढळून आले. दरम्यान लक्झरी बस वैभववाडी पोलीस स्टेशन येथे आणून पोलिसांनी त्या मालाचा पंचनामा करून अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थ वाहतूक केल्या प्रकरणी बस चालक व क्लिनर यांच्याविरोधात वैभववाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .लक्झरी मधला 24000 किमतीचा वैधानिक इशारा नसलेला तंबाखूजन्य सिगारेट जप्त केला आहे.ही कारवाई तंबाखू प्रतिबंधक कायदा कलम 188 नुसार कारवाई करण्यात आली आहे.त्यांना सोमवती 11 जानेवारी रोजी न्यायाययात हजर करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page