अंध, अपंग, निराधार, संघटनेचे बाबासाहेब आंबेडकर प्रांगणात उपोषण सुरुच..

आपत्ती व्यवस्थापन कायदा मोडणाऱ्या नकुल पार्सेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी..

सावंतवाडी /-

संपूर्ण भारत देशात लाॅकडाउन असताना पुण्यासारख्या रेडझोन मधून आपले जावई व मुलीला आणून ग्रामपंचायतीची परवानगी न घेता परस्पर घरात काॅरंटाईन केल्याप्रकरणी नकुल पार्सेकर यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन व साथ प्रतिबंधक रोग निवारण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी गेले तीन दिवस अंध अपंग ,निराधार बांधव भर उन्हात उपोषण करत असल्यामुळे त्यातील तिघांची प्रकृती खालावली असून त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सावंतवाडी बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरासमोर सुरू असलेले उपोषण सावंतवाडी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत, तहसीलदार राजाराम म्हात्रे, नगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मसुरकर यांच्या व्यतिरिक्त त्याठिकाणी कोणीही फिरकले नाहीत. खरेतर संबंधित विषय हा तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे येतो. मात्र, त्यांनी याबाबत हात झटकून जणू आपल्याशी त्याचे काहीच देणे घेणे नाही. अशा पद्धतीने व्यवहार केला आहे. तर सावंतवाडी शहराचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मसुरकर यांनी श्री. पार्सेकर यांनी माजगाव गरड येथे क्वारंटाइन केल्यामुळे तो भाग शहरात येत नाही व आपल्याकडून तशी परवानगी कुणी घेतली नाही. असे स्पष्ट केले आहे. मात्र, पार्सेकर यांच्या मुलीच्या पासवर खासकीलवाडा असे लिहीले होते. मात्र, त्या पत्त्यावर ते राहिले नाहीत. तो पत्ता नजरचुकीने दिला गेला असा खुलासा त्यांनी केला होता.

१४ दिवसाचे संस्थात्मक क्वारंटाईन असताना श्री. पार्सेकर यांनी आपल्या मुलीला व जावईला माजगाव गरड येथील आपल्या राहत्या घरात नेऊन क्वारंटाईन केले. याबाबत तेथील ग्रामपंचायतीने आक्षेप घेऊन गावातील ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन दिले होते.

पूणे या रेड झोनमधून सिंधुदुर्ग या ग्रीन झोनमध्ये येण्यासासाठी शासनाने स्नेहल नकूल पार्सेकर व राजकुमार मोरजकर यांना ई पास देताना कडक अटी शर्थी घालून ई पास दिलेला होता या पासमध्ये १४ दिवस संस्थात्मक विलगीकरण ( कोरंटाईन ) व १४ दिवस होम क्वांरटाईन अशी २८ दिवसांची क्वांरटाईन अट घालून पूण्यासारख्या रेड झोन मधून आलेल्या दांपत्यांच्या ई पासमध्ये कायदेशीर अटीनूसार पास दिलेला असताना केवळ 6 दिवसातच संस्थात्मक क्वांरटाईन करुन पूण्यातून आलेले हे दांपत्य सावंतवाडी रेस्ट हाऊसमधून खासकीलवाडा सावंतवाडी हा चूकीचा पत्ता देऊन माजगांव ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय माजगाव फाँरेस्टकाँलनीतील भर वस्तीमध्ये अँड नकूल पार्सेकर यांनी कुणाच्या परवानगीने स्वतंत्र विलगीकरणाची सोय नसताना या पूण्यातून रेड झोनमधून आणलेल्या दांपत्याला आपल्या रहात्या घरात नेऊन ठेवले याची तक्रार तात्काळ सरपंच माजगांव व शेजारील शेकडो नागरिकांनी दिलेली असताना अद्याप प्रशासनाने का कारवाई केलेली नाही असा थेट सवाल आता जनतेमधून केला जात आहे.ज्या आरोग्य अधिकाऱ्यांनी मँनेज करुन पार्सेकर दांपत्याला क्वारंटाईन कायदा मोडून चूकीच्या पत्यावर पाठविले त्या आरोग्य अधिकाऱ्यांवर का कारवाई झाली आहे का? असाही सवाल जनतेतून होत आहे.

वास्तविक ग्रामपंचायतीच्या भागात क्वारंटाईन व्हायचे असेल तर संबंधित ग्रामपंचायतीची नाहरकत परवानगी घ्यावी लागते. मात्र, अशा प्रकारची ग्रामपंचायतीला कोणतीही माहिती मिळाली नाही. असे सरपंच यांचे म्हणणे होते. म्हणून ग्रामस्थांनी तक्रारीचे निवेदन तहसीलदार, प्रांत अधिकारी यांना दिले होते. मात्र, त्यावर कोणतीही उचित कार्यवाही न झाल्याने सर्वांना समान न्याय या मागणीसाठी अंध, अपंग, निराधार, गेले तीन दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर समोर उपोषणास बसले आहेत. ज्यांनी कायदा मोडला त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा एवढीच रास्त मागणी घेऊन ते गेले तीन दिवस उपोषण करीत आहेत.उपोषण करत असलेले समीर गवंडे, हरिश्चंद्र राउळ, विठ्ठल शिरोडकर यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर महालक्ष्मी अंध अपंग निराधार संघटने आमच्या जीविताचे काय बरेवाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page