कुडाळ /-

रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या वतीने श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव येथे सॅनिटरी नॅपकीन वेंडींग व इन्सिनेटर मशीन्स देण्यात आली या मशीन्सचे उद्घाटन रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3170 च्या फस्टलेडी सौ उत्कर्षा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्राम पाटील, रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे अध्यक्ष सचिन मदने, सेक्रेटरी अभिषेक माने, माजी अध्यक्ष गजानन कांदळगावकर, राजन बोभाटे, एकनाथ पिंगुळकर, प्रमोद भोगटे, दिनेश आजगावकर, मुख्याध्यापक प्रशांत धोंड, उपमुख्याध्यापक संजय पिळणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सन 2019-20या वर्षात माजी अध्यक्ष एकनाथ पिंगुळकर यांच्या अध्यक्ष काळात रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 च्या डिस्ट्रिक्ट अनुदानातून श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव शाळेला सॅनिटरी वेंडींग व इन्सिनेटर मशीन्स चा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. सदर मशीन्स सन 2020-21 या वर्षात उपलब्ध होऊन त्याचे उद्घाटन श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव येथे नुकतेच करण्यात आले. कुमारवयीन मुलींना मासिक पाळी संदर्भात ज्या ज्या समस्या निर्माण होतात त्या दूर करण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी शासनाचा उत्कर्षा कार्यक्रम राज्यातील सर्व शाळांमध्ये सुरू आहे.

रोटरी इंटरनॅशनल कडून या वर्षी साक्षरता अभियानांतर्गत उत्कर्षा कार्यक्रम डिस्ट्रिक्ट 3170मध्ये पुढील तीन वर्षे सौ उत्कर्षा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार असल्याचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्राम पाटील यांनी स्पष्ट केले.

तसेच तिर्थक्षेत्र माणगाव येथील हायस्कूल मध्ये रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या माध्यमातून भविष्यातही विविध प्रोजेक्टस राबविण्याचा मानस श्री संग्राम पाटील यांनी व्यक्त केला. शाळेच्या विविध शैक्षणिक व भौतिक गरजाबाबत विवेचन मुख्याध्यापक प्रशांत धोंड यांनी व्यक्त केले. तसेच रोटरी क्लब ऑफ कुडाळ चेही आभार मानण्यात आले.यावेळी माणगाव हायस्कूल चे शिक्षकवृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page