राष्ट्रवादीकाँग्रेसचे पदाधिकारी काका कुडाळकर व माजी सभापती सुनिल भोगटे यांची उपोषणस्थळी भेट..

कुडाळ /-

निवती रस्त्याच्या प्रलंबित कामाला येत्या चार जानेवारीपर्यंत सुरुवात न केल्यास संबंधीत ठेकेदाराचा ठेका रद्द करावा त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी माजी जि प अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी काका कुडाळकर व माजी सभापती सुनिल भोगटे यांनी केली वेळप्रसंगी अशा ठेकेदाराला सळो की पळो करण्यासही मागे पुढे पाहणार नाही असा इशाराही दिला.

निवती रस्त्याचे अर्ध्यावर सोडलेले काम सुरू करा,ठेकेदार काम करत नाही संबंधीत ठेकेदाराला काळ्या यादीत टाका,असे सांगत कालपासून १००ते १५० निवती,ग्रामस्थांनी ,प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंता यांच्या येथील मुख्य कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.आज काका कुडाळकर व सुनील भोगटे यांनी घटनास्थळी भेट दिली निवती ग्रामस्थांनी मागील आठ दिवसापूर्वी उपोषणाचा ईशारा दिला होता परंतु याकडे ठेकेदार व अधिकारी यांनी कोणतीही कार्यवाही न केल्याने निवती ग्रामस्थ उपोषणाला बसलेआहेत गावातील बऱ्याच लोकांनी आपले व्यवसाय बंद ठेऊन हे या उपोषणात सहभाग घेतला आहे,उपोषण स्थळी कार्यकारी अभियंता श्री.ए .जे .पाटील ,शाखा अभियंता श्री.मेस्त्री यांच्याशी उपोषणकर्त्यांची चर्चा सुरू आहे.अजून कोणत्याही तोडगा निघाला नाही ,उपोषण चिघळण्याची शक्यता आहे.कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कुडाळ ऑफिस समोर पोलीस,होमगार्ड यांची तैनात ठेवले आहेत.प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत निवती रस्त्याचे बंद अवस्थेतील काम सुरू करा अन्यथा आमरण उपोषणाला बसणार असा ईशारा निवती येथिल ग्रामस्थांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या जिल्हा कार्यालयाला भेट देत २१ डिसेंबर रोजी कुडाळ येथील मुख्य कार्यकारी अभियंता श्री.ए .जे .पाटील यांना निवती ग्रामस्थांनी निवेदन देत दिला होता.

काम बंद असलेल्या रस्त्या संदर्भात चर्चा केली होती आज श्री कुडाळकर व भोगटे यांनी कार्यकारी अभियंता श्री.ए .जे .पाटील यांना धारेवर धरत संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करा वेळप्रसंगी आम्ही स्वस्थ बसणार नाही तुम्हाला न्याय मिळवून देईपर्यंत तुमच्यासोबत असणार असल्याचे सांगितले.

यावेळी उपोषणाला प्रामुख्याने किशोर सारंग ,तृप्ती कांबळी ,विलास आरोलकर, लक्ष्मण नाईक,उदय सारंग ,सुरेश पडते ,कांचन पाटकर,अनिल मेतर ,वीरश्री मेंतर ,निलेश मस्त,नागेश सारंग ,भारती धुरी,अजित खवणेकर ,सुधीर मेतर ,रामचंद्र भगत ,नमिता घाटवळ निवती ग्रामस्थ उपस्थित होते.कुडाळ,निवती रस्त्याचे अर्ध्यावर सोडलेल्या कामाबाबत निवती ग्रामस्थांनी आज दुसऱ्या दिवशी ,प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंता यांच्या मुख्य कार्यालयासमोरआमरण उपोषण सुरू केले त्यावेळी काका कुडाळकर सुनील भोगटे यांनी भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page