मालवण /-

‘अखंड जगताचे आराध्य दैवत श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा जागर व्हावा आणि शिवछत्रपती विचारांचा वारसा अखंड तेवत रहावा’ या उद्देशाने शिवदुर्ग ट्रेकर्स, आचरा महाराष्ट्र
यांच्या तर्फे भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शिवप्रसंगवर्णन स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून बहुसंख्य स्पर्धकांनी सहभाग नोंदवून शिवविचारांच्या जागराने स्पर्धा यशस्वी केली.
कोरोनाच्या काळात मानसिकरित्या खचलेल्या मानवजातीला उभारी देण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या विचारांचे अमृत मिळावे आणि लॉकडाऊनच्या काळातील रिकाम्या वेळेचा सदुपयोग होऊन स्पर्धकांतील सुप्त गुणांना वाव मिळावा हा या स्पर्धेचा मुख्य हेतू होता.
श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकाळातील कोणत्याही प्रसंगाचे वर्णन केलेला विडिओ ऑनलाईन स्वरूपात सादर करून स्पर्धेत सहभागी होणे अश्या अनोख्या पद्धतीने ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण 53 दर्जेदार विडिओ प्राप्त झाले. यामध्ये शिक्षक, विद्यार्थी, डॉक्टर, गृहिणी, विविध व्यावसायिक, नोकरदार, शेतकरी वर्ग तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांचे थेट 12 वे वंशज स्पर्धक म्हणून सहभागी झाले हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य. आठ मान्यवर परीक्षकांच्या परिक्षणाचे 70% व 30% गुण स्पर्धकांनी विहित कालावधीत युट्यूब वर मिळवलेल्या लाईक वर आधारित स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. या भव्य ऑनलाईन स्पर्धेचा *प्रथम क्रमांकाचा मानकरी कुमार विराज गणेश आरावंदेकर,दाभोली वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग हा ठरला आहे.* *द्वितीय क्रमांक डॉ. श्री. उमेश उत्तम सावंत, माजगाव सावंतवाडी* *तर तृतीय क्रमांक कुमार आकाश अंकुशराव घुटूकडे, आचरा मालवण* यांनी पटकावले आहेत.त्यांना शिवचरित्रग्रंथ, प्रमाणपत्र व मानाचा फेटा बक्षीसरूपात देण्यात येणार आहे, तर उर्वरित सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असून स्पर्धा यशस्विरित्या पूर्ण झाली आहे. भविष्यात ही स्पर्धा दरवर्षी कायम घेण्याचा शिवदुर्ग ट्रेकर्स चा मानस आहे. सदर स्पर्धेच्या परिक्षणाची जबाबदारी पेललेल्या सर्व मान्यवर परीक्षकांचे मनःपूर्वक आभार. स्पर्धा यशस्वीतेसाठी शिवदुर्ग ट्रेकर्स, आचरा च्या सर्व मावळ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page