दोडामार्ग /-

२४ डिसेंबर हा दिवस “राष्ट्रीय ग्राहक दिन” म्हणून साजरा केला जातो. ग्राहक म्हणून आपण सदोदित जागरूक असणे आवश्यक आहे. कोणत्याही वस्तू दुकानातून खरेदी करताना, खरेदी केलेल्या वस्तूंच्या किंमती, मुदत संपण्याची तारीख वजन इत्यादी गोष्टी तपासून पाहणे महत्वाचे आहे. आपण खरेदी केलेल्या वस्तूंची पावती (बिल) घेण्याची सवय आपण स्वतःला लावून घेतली पाहिजे.

ग्राहक राजा आहे असे नुसतेच बोलून चालणार नाही, तर तेवढीच जागरूकता आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये दाखवली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने ग्राहक हा राजा होईल. आज राष्ट्रीय ग्राहक दिनापासून आपण सगळे मिळून निर्धार करूया कि आजपासून आपण नुसतेच ग्राहक न होता एक सुजाण आणि जागरूक ग्राहक होऊया ,असे सांगत दोडामार्ग निवासी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी जागो ग्राहक जागो हे वाक्य ग्राहकांच्या मना पर्यंत पोहचवत तसेच उत्कृष्ट रित्या मार्गदर्शन करत दोडामार्ग तहसीलदार कार्यालयात ग्राहक दिन साजरा करण्यात आला यावेळी निवडणूक नायब तहसीलदार संजय कर्पे,महसुल नायब तहसिलदार एन. एन. देसाई , उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page