नवी दिल्लीः नव्याने सुरू करण्यात आलेल्या डोअर स्टेप बँकिंग या सुविधेंतर्गत आपल्याला घरबसल्या बर्‍याच बँकिंग सुविधा मिळतात. सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडियाने (Union Bank of India) ग्राहकांनाही सुविधा देखील दिलीय. ही सेवा 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्ध, अपंग आणि गंभीर आजारी लोकांसाठी प्रभावी ठरू शकते. डोअर स्टेप बँकिंगचा पाया काही वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घातला होता.
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सप्टेंबरमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या (PSB) डोअर स्टेप बँकिंग सेवा उपक्रम सुरू केलाय. यामुळे ग्राहकांना त्यांच्या घरी बँकिंग सेवा मिळविणे सोपे होणार आहे. हा उपक्रम वित्तीय सेवा विभागाने 2018 मध्ये सादर केलेल्या ‘वर्धित प्रवेश आणि सेवा उत्कृष्टता’ (EASE) सुधारणांचा एक भाग आहे.
ग्राहक मोबाईल अ‍ॅप्स आणि कॉल सेंटरद्वारे डोअर स्टेप बँकिंग सेवा वापरू शकतात. या चॅनेलद्वारे ग्राहक त्यांच्या सेवा विनंतीचा मागोवा घेऊ शकतात. घसबसल्या चेक सिटिंग, डिमांड ड्राफ्ट, पिक अप ऑर्डर आणि पैशांच्या व्यवहारासंदर्भातील सेवा यांसारख्या विना-वित्तीय सेवा उपलब्ध असतील.

या सुविधा डोअर स्टेप बँकिंग सर्व्हिसेसच्या पिकअप सर्व्हिसमध्ये उपलब्ध असतील
*चेक / डिमांड ड्राफ्ट / पे ऑर्डर
*नवीन चेकबुक रेक्युशन स्लिप
*हयातीचा दाखला
* 15 जी / 15 एच फॉर्म
*आयटी चालान / सरकारी व्यवसाय / जीएसटी भरले जाऊ शकते.

वितरण सेवा
* अकाऊंट स्टेटमेंट
*नॉन-पर्सनाइज्ड चेक बुक, डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर
*रोख पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध
*प्रीपेड इन्स्ट्रुमेंट / गिफ्ट कार्ड
*टीडीएस / फॉर्म 16 प्रमाणपत्र
*मुदत ठेव पावती / लेखांकन

ग्राहकांना त्यांच्या घरी बँकेच्या सेवा युनिव्हर्सल टच पॉइंट्स, वेब पोर्टल किंवा कॉल सेंटरच्या मोबाईल अ‍ॅपवरून पुरविल्या जातील. देशातील 100 केंद्रांवर निवडक सेवा प्रदात्यांद्वारे नियुक्त केलेल्या डोअर स्टेप बँकिंग एजंट्सद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page