कुडाळ /-

आमचा गाव आमचा विकास अंतर्गत सरपंच / ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची कार्यशाळा आज कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथील कार्यक्रमात संपन्न झाली.आमचा गाव आमचा विकास (GPDP) ही संकल्पना 14 वा वित्त आयोग सन 2015-16 ते 2019/20 पासून अंमलात आली आहे. आता 15 वा वित्त आयोग सन 2021 ते 2024/25 पर्यंत कालावधी आहे. सदर कालावधी साठी पंचवार्षिक आराखडे तयार करणेत आले आहेत, आणि त्यामधुन प्रत्येक वर्षी वार्षिक आराखडे तयार करावयाचा असतो.

केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार 15 वा वित्त आयोग 50% बंधित आणि 50% अबंधित स्वरुपात येत असून त्याप्रमाणे कामांचे नियोजन करावयाचे आहे.त्यासाठी सरपंच/ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी यांची दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सदर कार्यशाळेस यशदा पुणे मार्फत प्रशिक्षित तज्ञ मार्गदर्शक श्री. तुकाराम उर्फ दादा साईल आणि श्री.संतोष पाटील यांनी वार्षिक आराखड़े योग्य पदधतीने कसे करावेत यासंबंधी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस मा.सभापती, मा.उपसभापती, मा.गटविकास अधिकारी यांनी मार्गदर्शन करान योग्य पध्दतीने व निकषानुसार आराखडे मुदतीत तयार करुन पंचायत समितीस सादर करावेत, असे आवाहन केले.

कार्यशाळेस सौ. नुतन आईर- सभापती, पंचायत समिती कुडाळ,श्री. जयभारत पालव-उपसभापती, पंचायत समिती कुडाळ, श्री. विजय चव्हाण- गटविकास अधिकारी, पंचायत समिती कुडाळ, श्री.मोहन भोई- सहाय्यक गटविकास अधिकारी, पंचायत समिती कुडाळ, सौ.अनघा तेंडुलकर-पंचायत समिती सदस्या, श्री.आर.डी जंगले व श्री.संजयकुमार ओरोसकर-विस्तार अधिकारी(पं) हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page