आचरा-
आचरा मार्गे जाणारया कणकवली तोंडवळी एस टी बस मधून शुक्रवारी सायंकाळी प्रवास करणाऱ्या राठीवडे येथील विराज जाधव यांची एस टी बस मध्ये राहिलेली बॅग बेळणे चेक पोस्ट पोलीस अंमलदार अनिकेत सावंत यांच्या तत्परतेने त्यांना परत मिळाली.अनिकेत सावंत यांच्या या तत्परतेबद्धल आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी अभिनंदन केले आहे.
शुक्रवार दिनांक-१८/१२/२०२० रोजी सायंकाळी ७:३०. चे सुमारास कणकवली ते तोंडवली (वस्तीची गाडी) अशा जाणाऱ्या बस मधून विराज जाधव, राठीवडे व त्यांचे कुटुंबीय राठिवडे येथे आपल्या घरी जात होते ते सदर बस मधून बेळणे येथील बस थांब्यावर उतरले.बस तोंडवलीच्या दिशेने जायला गेली.बस मधून उतरल्यानंतर विराज जाधव यांच्या लक्ष्यात आले की आपली बॅग एस टी बस मध्येच राहिली. महत्वाची कागदपत्रे आणि काही रोख रक्कम व इतर वस्तु असलेली बॅग एस टी बस मध्येच राहिल्याचे लक्षात आल्यावर जाधव यांचा गोंधळ उडाला. त्यावेळी त्यांनी एस टी बस मागे जाण्यासाठी रिक्षा वगेरे वाहन शोधले परंतु सदर वेळी वाहन उपलब्ध न झाल्याने त्या बसकडे जाणे शक्य झाले नाही.. त्यावेळी स्टॉप पासून जवळच असलेल्या बेळणे पोलीस चेकपोस्ट ला विराज व त्यांच्या कुटुंबीयांनी धाव घेतली व बेळणे येथे कर्तव्यावर असलेले पोलीस अमलदार अनिकेत सावंत यांना सदर घटनेबाबत सांगितले. त्यावेळी पोलीस अनिकेत सा वंत व त्यांचे सहकारी यांनी तात्काळ कणकवली बस डेपो कडून सदर बस चालकाचा संपर्क क्रमांक घेऊन ताबडतोब बस चालकाला फोन करून सदर बॅग गाडीतच असल्याची खात्री करण्यास सांगितले ‌ त्यावेळी बस आचरा , तिठा येथे पोहोचली होती.सदर बॅग बस मध्येच असून सुरक्षित असल्याचे चालक यांनी सावंत यांना सांगितले. त्यावेळी अनिकेत सावंत यांनी सदरची बॅग आचरा तिठा येथे कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार पुरळकर यांचेकडे देणेबाबत सांगितले..
सदरची बॅग राठीवडे येथील रहिवासी असलेले विराज जाधव यांचे पाहुणे श्री. तांबे यांची असून बॅग सुरक्षित रित्या तांबे यांचे ताब्यात देण्यात आली. आचरा पोलीस अमलदार अनिकेत सावंत यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एस टी बस मध्ये राहिलेली बॅग तांबे यांच्या पर्यंत पोहोचली.त्यांच्या या कर्तव्य तत्परतेबद्धल त्यांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page