आचरा –

चिंदर पडेकाप येथे भरवस्तीत घुसून मांगरातील शेळीचा फडशा पडल्याची घटना मध्यरात्री घडली. शनिवारी पहाटे चरण्यासाठी शेळया सोडण्यासाठी गेलेले संतोष जंगले यांच्या निदर्शनास आली. भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या माळरानावर असलेल्या जंगले कुटूंबीयांच्या वस्तीत घुसला होता. संतोष जंगले यांच्या बकरीचा बिबट्याने फडशा पडल्याने सुमारे 14 हजाराचे नुकसान झाले आहे. बिबट्या राहत्या वस्तीत घुसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती जंगले यांनी वनविभागाला दिली आहे.

या अगोदरही रानात चरायला सोडलेल्या जंगले कुटुंबीयांच्या सहा शेळ्या २२ नोव्हेंबरला बिबट्याने मारल्या होत्या. त्यामुळे या भागात बिबट्याची दहशत पसरली असून तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे
फोटो
चिंदर पडेकाप येथे मांगरातील शेळीला बाहेर खेचून फडशा पाडल्याचे दाखवताना संतोष जंगले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page