वेंगुर्ले /

नवीन मतदार नोंदणी करणाऱ्या नागरीकांना वेंगुर्ले तहसिलदार यांनी सांगितलेल्या कागदपत्रांची पुर्तता करून मतदार नाव नोंदणी केलेली असताना कुण्या एका राजकिय पक्षाच्या तक्रारीनुसार त्या मतदारांना मतदारांना नोटीसा काढून व त्यांची नावनोंदणी करवून घेणाऱ्यांना त्रास देणे. हा मतदारांवर अन्याय आहे. अशा प्रशासनाच्या धोरणामुळे मतदार म्हणून नोंदणीस कुणीही येणार नाही. मतदार नावनोंदणीवेळी त्याची खातर जमा जी कागद पत्रे त्यासाठी आवश्यक आहेत त्या कागदपत्रानुसार करा. उगाच राजकिय तक्रारीने नवीन नावनोंदणी करणाऱया मतदारांना यापुढे प्रशासनाने त्रास देवू नये. यापुढे असे झाले शिवसेना गप्प रहाणार नाहि. असा इशारा शिवसेना नेते संदेश पारकर यांनी वेंगुर्ले तहसिलदार कार्यालयात व्यक्त केला.अलिकडकेच वेंगुर्ले एका राजकिय पक्षाने बोगस मतदार नावनोंदणी झाली असल्याबाबत तक्रार करून नवीन नाव नोंदणी झालेल्या शहरातील वॉर्ड क्र. 11 मधील 20 जणांना मतदार नोंदणी तपासणीसाठी नोटीसा काढल्या. याबाबत नवीन मतदारांची नाव नोंदणी करून घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना त्या मतदारांनी आलेल्या तहसिलदारांच्या नोटीसा दाखविल्या. त्यावरून वेंगुर्ले दौऱ्यावर आलेले शिवसेना नेते संदेश पारकर यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह वेंगुर्ले तहसिलदार कार्यालयात भेट देत तहसिलदार प्रवीण लोकरे हे नसल्याचे नायब तहसिलदार नागेश शिंदे यांचेशी या विषयावर चर्चा करीत यापुढे राजकिय तक्रारीचा विचार करून नका स्थानिक नागरीकाची तक्रार लेखी स्वरूपांत घ्या. त्यापेक्षा नवीन मतदार नावनोंदणीवेळी लागणाऱया कागदपत्रांची पुर्तता झाली आहे कि नाहि ते पहा. व नाव नोंदणी करा. नवीन मतदारांना मतदार नाव नोंदणी व मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्यासाठी तहसिलदार कार्यालयात नोटीसा देवू व वारंवार बोलावून त्रास देण्याचा प्रयत्न प्रशासनाने करू नये. तसे होत असल्यास शिवसेना गप्प रहाणार नाहि. असा ईशाराही दिला आहे.

यावेळी उपस्थितांत शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, शहर सेना प्रमुख अजित राऊळ, नगरसेविका सुमन निकम, सचिन वालावलकर, विवेक आरोलकर, निलेश चमणकर, सुरेश भोसले, बाळा नाईक, अभिनय मांजरेकर, रमेश मयेकर,डेलिन डिसोजा, गजानन गोलतकर, श्री. हळदणकर यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page