नवी दिल्लीः मोदी सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM kisan samman nidhi scheme) योजनेच्या सहाव्या हप्त्याचा देशातील 3.7 कोटी लोकांना फायदा झाला. आता सातव्या हप्त्याचे पैसे हस्तांतरित केले जातायत. आपल्या सरकारने पीएम किसान योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत दरवर्षी सुमारे 75 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळतात. एकूण दहा वर्षांत सुमारे साडेसात लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जातात.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेंतर्गत आतापर्यंत 6 हप्ते देण्यात आलेले असून, सातवा हप्ता पाठविला जात आहे.

रेकॉर्डबरोबर आहे की नाही हे कसे तपासावे
>> पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची अधिकृत वेबसाइट (pmkisan.gov.in) आहे. वेबसाइट लॉग इन करावे लागेल. यात तुम्हाला ‘शेतकरी कॉर्नर’ टॅब क्लिक करावे लागेल.
>> आपण यापूर्वी अर्ज केला असेल आणि तुमचा आधार योग्य प्रकारे अपलोड झाला नसेल किंवा काही कारणास्तव आधार क्रमांक चुकीच्या पद्धतीने प्रविष्ट केला गेला असेल तर त्याची माहिती त्यात सापडेल.
>> शेतकरी कॉर्नरमध्ये पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नावनोंदणी करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे.
>> यात शासनाने सर्व लाभार्थ्यांची संपूर्ण यादी अपलोड केली आहे. आपल्या अर्जाची स्थिती काय आहे. याबाबत आधार क्रमांक / बँक खाते / मोबाइल नंबरद्वारे शेतक-यांना माहिती मिळू शकते.
>> या योजनेचा लाभ देण्यात आलेल्या शेतक-यांची नावे राज्य / जिल्हानिहाय / तहसील / गावानुसार पाहिली जाऊ शकतात.

मंत्रालयाशी संपर्क साधण्याचीही सुविधा
मोदी सरकारची ही सर्वात मोठी शेतकरी योजना असल्याने शेतकर्‍यांना अनेक प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. यात एक हेल्पलाईन नंबर आहे. ज्याद्वारे देशातील कोणत्याही भागातील शेतकरी थेट कृषी मंत्रालयाशी संपर्क साधू शकतात.
पंतप्रधान किसान टोल फ्री क्रमांक: 18001155266
पंतप्रधान किसान हेल्पलाईन क्रमांक: 155261
पंतप्रधान किसान लँडलाईन क्रमांक: 011—23381092, 23382401
पंतप्रधान किसन यांची नवीन हेल्पलाईन: 011-24300606
पंतप्रधान किसन यांची आणखी एक हेल्पलाईन आहे: 0120-6025109
ईमेल आयडी: pmkisan-ict@gov.in

नवीन शेतकर्‍यांची नोंदणी कशी करावी ?
जर तुम्ही अद्याप पंतप्रधान किसान सन्मान निधी मिळविण्यासाठी नोंदणी केली नसेल तर आताही नोंदणी करून तुम्हाला फायदा मिळवता येऊ शकेल. सर्व प्रथम, आपल्याला या योजनेशी संबंधित अधिकृत साइटवर जावे लागेल. ज्यामध्ये शेतकरी कॉर्नरचा पर्याय दिसेल. नवीन शेतकरी नोंदणी टॅबवर क्लिक करा.
त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यामध्ये आपल्याला आधार कार्डचा तपशील भरावा लागेल. ते भरून झाल्यानंतर दुसरे पान तुमच्यासमोर उघडेल, जर तुम्ही आधीच नोंदणी केली असेल, तर तुमची माहिती येईल आणि तुम्ही पहिल्यांदा नोंदणी करत असाल तर असे लिहिलेले येईल की RECORD NOT FOUND WITH GIVEN DETAILS, DO YOU WANT TO REGISTER ON PM-KISAN PORTAL. तुम्हाला पंतप्रधान किसान पोर्टलवर नोंदणी करायची आहे का? यावर आपल्याला होय करावे लागेल.

यानंतर फॉर्म दिसेल जो भरावा लागेल. त्यामध्ये योग्य माहिती भरल्यानंतर ती सेव्ह करा. यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये आपल्यास आपल्या जमिनीच्या सातबाराचा तपशील विचारला जाईल. विशेषत: सातबारावरील गट क्रमांक आणि खाते क्रमांक भरावे लागणार आहे. आपण जतन करताच नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page