कुडाळ /

ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे संचालक व महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टकर, यस वाहतुक महासंघाचे सर्वेसर्वा श्री. प्रकाशसेठ गवळी साहेब यांचे हस्ते कुडाळ येथे निवडीचे पत्र देवून वालावलकर यांना गौरविण्यात आले यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष शिवाजी घोगळे, सिंधुदुर्ग जिल्हा वाहतुक संघटनेचे पदाधिकारी कांदळगांवकर, राजन बोभाटे, दुमिंग फनांडीस, प्रशांत सडवेलकर, बाबी कुंभार व वाहतुकदार उपस्थित होते. प्रस्ताविक शिवाजी घोगळे यांनी

केले. देशात ट्रक चालक मालक यांचे मार्फत दळवळणाची मोठी यंत्रणा कार्यरत असून देशातील अर्थव्यवस्था मजबूत करण्यात व जीवनाश्यक वस्तुसह जनसामान्याच्या गरजा भागविण्याचे काम या यंत्रणेकडून होत असते. देशातील दळणवळण क्षेत्रासंबंधी धोरण निश्चित करणे. शासनाशी चर्चा करणे, ट्रक चालक मालकांचे प्रश्न विचारात घेऊन त्या चर्चात्मक मार्गाने सोडविणे याकरीता शासन स्तरावर अधिकृत अशी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोट काँग्रेस नवी दिल्ली ही कमिटी असून या मॅनेजमेंट कमिटीवर कोंकण व गोवा या विभागातून प्रथमच श्री. मनोज शरद वालावलकर या युवा व्यावसायिकांची निवड करण्यात आलेली आहे. संघटन कौशल्य वाहतुक दारांचे अडचणी व वाहतूक दारांच्या समस्या सोडबून

त्यांना न्याय देण्यासाठी अभ्यासूपणे काम करणारी व्यक्ती म्हणून ही नियुक्ती झालेली आहे. याबाबतचे अधिकृत पत्र श्री. मनोज वालावलकर यांना देण्यात आले. या भारतीय पातळीवरील संघटनेच्या नावात काँग्रेस शब्द असला तरी ही संघटना कोणत्याही पक्षाशी संबंधीत नसून वाहतुकदारांची अधिकृत संघटना आहे.

या नियुक्तीने कोकण व गोवा विभागातील वाहतुक दारांकडून कोतुक होत आहे. या नियुक्तीनंतर वाहतुकदार ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक व महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, बस, टँकर वाहतुक महासंघाचे सर्वे सर्वा प्रकाशराव गवळी (सावकार), बाबा शेख, शिवाजी घोगळे, अशोक कांदळगांवकर, राजन बोभाटे, विजय वालावलकर, शरद वालावलकर, प्रशांत सडवेलकर, दुमिंग फर्नाडीस, बाकी कुंभार अनेक संघटना पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page