एसटी प्रशासनाच्या गलथान कारभाराचा एसटी कर्मचाऱ्यांना फटका..

कुडाळ /-

दोन आठवड्यांपूर्वी बेस्ट सेवेसाठी पाठवण्यात आलेल्या ४८ एसटी कर्मचाऱ्यांनपैकी २० कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कुडाळ एसटी डेपोतून बेस्ट सेवेसाठी पाठवण्यात आलेले ४८ कर्मचारी रविवारी सिंधुदुर्गात परत आले. आज त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. कोरोना तपासणी मध्ये २० एसटी कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. अजुन ५ एसटी कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा स्वाब तपासणी केली जाणार आहे. या एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरीच कॉरंटाईन करून ठेवले जाणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. जर या कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरीच कॉरंटाईन करून ठेवले जाणार असेल तर त्याच्या कुटुंबीयांनाही कोरोणाची लागण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

या अगोदरही बेस्ट सेवेसाठी पाठवण्यात आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनपैकी ५ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले होते त्यांना १४ दिवस त्यांच्याच घरी कॉरंटाईन करून ठेवण्यात आले होते. एस टी प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाशी सामना करावा लागत आहे. एवढं सगळं होऊनही परत अजुन कर्मचारी बेस्ट सेवेसाठी मुंबईत पाठवण्यात आले. या सगळ्या गोष्टींचा विचार केला असता एस टी प्रशासनाला एसटी कर्मचाऱ्यांची पर्वा नसल्याच स्पष्ट होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page