उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात रोडवेज बस आणि गॅस टँकरची धडक झाल्यानंतर मोठा अपघात घडलाय. बुधवारी सकाळी १०.०० वाजता धुक्यात समोरचं स्पष्ट न दिसल्यामुळे हा अपघात घडल्याचं समोर येतंय.

 

बसमधून जवळपास ३२ लोक प्रवास करत होते. यापैंकी ७ जणांचा मृत्यू झाला तर २५ जण गंभीर जखमी झाले. जखमींना तत्काळ वेगवेगळ्या रुग्णालयांत हलवण्यात आलं.

पोलिसांनी आत्तापर्यंत सात मृतदेह ताब्यात घेतले आहेत. मृत्यूचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

 

 

संभलच्या धनारी स्टेशन परिसरात मुरादाबाद – आग्रा महामार्गावर हा अपघात घडलाय. गँस टँकर अलीगडकडून मुरादाबादकडे निघाला होता. तर रोजवेजची बस मुरादाबादकडून अलीगडकडे निघाली होती. या दरम्यान मानकपूरच्या मढय्यानजिक टँकर आणि बस धुक्यात समोरासमोर आले. वाहनांचा वेग जास्त असल्यानं आणि समोरचं अंधुक दिसल्यानं या दोन्ही वाहनांनी एकमेकांना धडक दिली.

 

अपघातानंतर स्थानिक लोक घटनास्थळी जमा झाले. या अपघाताची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर प्रशासनाकडूनही मृतांना आणि जखमींना बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आलं.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page