सातारा: कराडमध्ये एका अल्पवयीन तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. शहरातील बाराडबरे परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. आदित्य गौतम बनसोडे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. आदित्य हा 16 वर्षांचा होता. आदित्यवर धारदार शस्त्राने वार करुन तीन संशयीत फरार असल्याची माहिती मिळतेय. या संशयितांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. हत्येच्या या घटनेमुळे संपूर्ण कराड शहर हादरलं आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींचा शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page