शासकीय अधिकारी म्हणजे देवधुत नव्हे,पण आपण देवधुत समजतो ही मात्र सामान्य जनतेची चूक,,,,

दोडामार्ग /-

शासकीय अधिकारी म्हणजे देवधुत नव्हे ,पण आपण मात्र देवधुत समजून त्यांना जी वागणूक देतो ही मात्र आपल्या सामान्य जनतेची चूक अस म्हणायला हरकत नाही. अशीच एक घटना दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी गावचे सरपंच लखु खरवत यांच्या बाबतीत घडली असून जीवे मारण्याची धमकी देखील त्यांना देण्यात आलेली आहे, तसेच त्यांना अपमानास्पद वागणूक देणे याबाबत सरपंच संघटना दोडामार्ग च्या वतीने विजवीतरण चे साटेली भेडशी येथे कार्यरत कनिष्ठ अभियंता जीवन चराठे यांचा प्रसिद्धी पत्रकाद्वारे अध्यक्ष पराशर सावंत यांनी जाहीर निषेध केला आहे.

या प्रसिद्धी पत्रकानुसार असे म्हटले आहे की, सरपंच पदावर असणाऱ्या व्यक्तीला अशी अपमानास्पद वागणूक देणे शोभत नाही, त्यामुळे या अधिकाऱ्यावर शासनाने कारवाई करावी जेणेकरुन बेजबाबदार अधिकाऱ्यांवर याची वचक बसेल, कोणत्याही परिस्थितीत सरपंच लखु खरवत यांच्यामागे सरपंच संघटना उभी राहणार असून या अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास तालुक्यातील सर्व सरपंच उपोषण करतील,या प्रसिद्धी पत्रकावर देवेंद्र शेटकर, स्नेहा गवस, संगीता देसाई, सूर्यनारायण गवस, विनायक शेटये, दिनेश नाईक, दिक्षा महालकर, संदिप नाईक, पराशर सावंत, महादेव गवस, विशांत तळवडेकर आदी सरपंचांची नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page