वेंगुर्ला

वेंगुर्ले बंदर येथे जिवरक्षक म्हणून सेवा बजावणारे भाजपाचे २७० / ४७ चे बुथप्रमुख भगवान कुबल व त्याचा सहकारी दत्तप्रसाद नांदोसकर यांनी आपला जिव धोक्यात घालून वेंगुर्ले बंदर येथील समुद्रात बुडणाऱ्या १८ वर्षीय युवकाला जिवदान दिले .त्यांच्या या धाडसी कृतीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा येथील पेडणेकर कुटुंबिय सागरी पर्यटनासाठी वेंगुर्ले बंदर येथे आले असता त्यातील नयन पेडणेकर हा युवक तोल जाऊन समुद्रामध्ये पडला. ही गोष्ट ज्यावेळी तेथे जिवरक्षक म्हणून सेवा बजावणारे भगवान कुबल व दत्तप्रसाद नांदोसकर यांच्या निदर्शनास आल्यावर जिवाची पर्वा न करता त्या युवकाला जिवदान दिले.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भाजपा वेंगुर्लेच्या वतीने तालुका कार्यालयात त्या दोघांचा सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके, महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, नगरसेवक नागेश ऊर्फ पिंटू गावडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर, शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर, ता.उपाध्यक्ष निलेश दत्तात्रेय सामंत,ता. उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, आसोली शक्ती केंद्र प्रमुख विजय बागकर,तुळस शक्ती केंद्र प्रमुख संतोष शेटकर, म्हापण शक्ती केंद्र प्रमुख नाथा मडवळ, रेडी शक्ती केंद्र प्रमुख जगंन्नाथ राणे, ता.चिटनीस समीर चिंदरकर, अनु. जाती मोर्चा चे गुरुप्रसाद चव्हाण, उभादांडा उपसरपंच गणपत केळुसकर, युवा मोर्चा सरचिटणीस केशव नवाथे, बुथप्रमुख – प्रकाश मोटे, शेखर काणेकर,सुनील घाग,शिरोडा युवा अध्यक्ष सोमकांत सावंत,चंद्रकांत चव्हाण, शरद मेस्त्री आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page