▪️१९३०: प्रभातचा उदयकाल हा चित्रपट मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

▪️१९४१: दुसरे महायुद्ध -हंगेरी व रुमानियाने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.

▪️१९९१: मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे २३वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

▪️२००१: जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तय्यबा च्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला

▪️२००२: ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा फाळके पुरस्कार जाहीर.

▪️२०१६: सायरस मिस्त्री यांना टीसीएसच्या संचालक मंडळ आणि अध्यक्ष पदावरून काढण्यात आले.

▪️२०१६: अँडी मरे आणि अँजेलीक्यू केरबर यांना आयटीएफ (इंटरनॅशनल टेनिस फेडेरेशन) ने २०१६ जागतिक विजेते घोषित केले.

▪️१८९९: छायालेखक (cinematographer) पांडुरंग सातू नाईक यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९७६ – मुंबई)

▪️१९४०: भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक संजय लोळ यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुन २००५)

▪️१९५४: भारतीय ऑटोलरीगोलॉजिस्ट आणि राजकारणी हर्षवर्धन यांचा जन्म.

▪️१९५५: गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचा जन्म.

▪️१९८६: अभिनेत्री स्मिता पाटील यांचे निधन. (जन्म: १७ ऑक्टोबर १९५५-पुणे)

▪️१९९४: यशवंतराव चव्हाण यांचे निकटचे सहकारी विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे यांचे निधन.

▪️१९९६: स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, कॅपिटॉल बॉम्बस्फोटाचे सूत्रधार श्रीधर पुरुषोत्तम तथा शिरुभाऊ लिमये यांचे निधन.

▪️२००६: अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे संस्थापक लामर हंट यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १९३२)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page