कुडाळ /-

   
कुडाळ तालुक्यातील डिगस गावची ग्रामदेवता श्री देवी काळंबा मंदीरात रविवार दि. 13 डिसेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी कोरोना मुळे शासनाच्या नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने जत्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. सकाळी श्रींची विधिवत पूजा, विविध धार्मिक कार्यक्रम, दिवसभर श्रींचे दर्शन, ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे, रात्री 11 वा. पालखी मिरवणुक व नंतर 12 वा.आजगांवकर दशावतारी नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. यावेळी भाविक – भक्तांनी शासनाच्या नियमांचे पालन करून उपस्थित राहावे असे आवाहन डिगस ग्रामस्थांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page