सिंधुदुर्ग /-

माजी सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य च्या कार्यालयाचे उद्घाटन ओरोस गरुड सर्कल येथे ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री. हांडे , श्री शिर्के, श्री. तातोबा गवस,श्री.संजय सावंत व जिल्ह्यातील असंख्य माजी सैनिक हजर होते.

त्यावेळी ब्रिग. सुधीर सावंत म्हणाले की, माजी सैनिकांनी समाजाला दिशा दाखवली पाहिजे. सैनिक फेडरेशन हे एक महासंघ आहे. सर्व सैनिक संघटना चे एक महासंघ आहे. सैनिकांच्या एकीसाठी व सैनिकांच्या कल्याणासाठी एकसंघ होऊन समाजाला दिशा दाखवू. तरुणांना क्रीडा क्षेत्रात प्रशिक्षण देवून ऑलिम्पिक मेडल जिल्ह्याला मिळवून द्यावे. सैन्यात भरती होण्यासाठी मदत करावी.आपल्या गावांना समृद्ध आणि आनंदी बनवावे. त्याच बरोबर उद्योग क्षेत्रात सैनिकांनी आणि युवकांनी प्रगती करावी. सैनिकांचे वय ३५ असताना निवृत्त होतात. मग नोकरीसाठी दारोदार भटकतात. त्याउलट इतर क्षेत्रात ५८ वयापर्यंत नोकरी करतात. मग सैनिकांवर अन्याय का? आपला हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. तसेच मुलींना सैन्यात अधिकारी बनविण्यासाठी प्रयत्न केले आणि ते यशस्वी सुद्धा झाले. आपल्या जिल्ह्यातील मुलगी पहिली सैनिक अधिकारी झाली. श्री हांडे म्हणाले सैनिकांचा आवाज सरकार समोर मांडण्यासाठी एक संघटना असावी. त्यासाठी सैनिक फेडरेशन बनवण्यात आली. महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशन च्या अध्यक्षपदी एकमताने ब्रिगे.सुधीर सावंत यांची निवड झाली. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा समितीवर अध्यक्षपदी श्री. पद्मनाभ परब, उपाध्यक्षपदी श्री. विलास वंजारे व सचिव पदी श्री. चंद्रशेखर जोशी यांची एकमताने निवड झाली. श्री. तातोबा गवस सेवानिवृत्त सैनिक संघटना अध्यक्ष म्हणाले की, लवकरच सावंतवाडी येथे सरकारी जागा मिळेल.

ह्या कार्यालयातून सैनिकांचे प्रश्न सोडविले जातील. या नंतर माजी सैनिकांनी जिल्ह्यातील महत्वाच्या बाबींवर आपले विचार मांडले. त्यामध्ये श्री. बाळकृष्ण चव्हाण म्हणाले, सिंधुदुर्ग सैनिक कल्याण केंद्रात अधिकार्‍याची नेमणूक होणे गरजेचे आहे. ती जागा बरेच वर्ष रिक्त आहे. सनिक भरती जिल्हयासाठी स्वतंत्र व्हावी. ECHS फार वाईट परिस्थिती आहे. ते सर्व सोयी सुविधांनी उपलब्ध नाही. त्यामध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे. ECHS द्वारे डोळ्यांची शस्त्रक्रिया डॉ. गद्रे मार्फत केली जातात. पण डॉ. गद्रे माजी सैनिकांची लुट करून शस्त्रक्रिया केल्याचे सांगण्यात आले व ते बिल देत नाही असे माजी सैनिक चंद्रशेखर जोशी म्हणाले. या नंतर सर्व माजी सैनिकांनी ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या उपस्थितीतमध्ये ECHS सेंटर ला भेट देऊन पाहणी केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page