वेंगुर्ला – वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार ११ डिसेंबर रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने संपन्न होत आहे. यानिमित्त रात्रौ ११ वा. पालखी व त्यानंतर वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे.
मंदिरात येताना भाविकांनी व जत्रा कालावधीमध्ये मिठाई, खाद्यपदार्थ, हॉटेल व खेळण्यांच्या दुकानदारांनी शासनाच्या आरोग्य यंत्रणेच्या सूचनेनुसार मास्क, सॅनिटायझेशन व सोशल डिस्टंसींग आदी नियमांचे पालन करावे,असे आवाहन श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page