दर्पण स्टुडंट फेडरेशनच्या वतीने दर्पण प्रबोधिनीच्या युट्यूबवर सादरीकरण

दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या संस्थेच्या दर्पण स्टुडंट फेडरेशनच्या वतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी कवी उत्तम पवार यांच्या सत्तेच्या आतबाहेर या काव्यसंग्रहातील काही निवडक कवितांवर आधारित क्रांतीगर्भ सादरीकरणाचा उत्कट अविष्कार सादर करण्यात आला.
राजेश कदम यांच्या संकल्पनेतून आणि किशोर कदम यांचे दिग्दर्शनातून दर्पण कलावंत संदेश कदम, विशाल कासले,राहुल कदम, आणि दिनेश कदम यांनी सादर केलेल्या या काव्यमय आविष्कार कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आनंद तांबे, अनिल तांबे यांचे लाभले. दर्पण परिवारातील कार्यकर्त्यांच्या सहकार्याने महापरिनिर्वाणदिनी महामानवाला अभिवादन करणारा हा काव्यमय आविष्कार विशेष लक्षणीय ठरला.
कवी उत्तम पवार यांनी आपल्या कवितेतून बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीची विचारधारा परिवर्तनाच्या सम्यक दिशेने नेण्याचा प्रयत्न आपल्या ‘सत्तेच्या आतबाहेर ‘ या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून केला आहे. हीच प्रेरणा घेऊन दर्पण प्रबोधिनी च्या स्टुडंट फेडरेशनने या दृश्य सादरीकरणातून ही विचारधारा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दर्पणच्या युट्यूबवर सर्वांना पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली.
या संपूर्ण सादरीकरणाचे दृश्यचित्रीकरण आणि संकलन तंत्रज्ञ विशाल हडकर यांचे असून शीर्षक गीत ए. आर. प्राॅडक्शन,कल्याण येथील प्रसिद्ध गायक राजू सर्पे यांचे आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी सादर झालेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्वांनी विशेष कौतुक करून महामानवाला अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page