कुडाळ तालुक्यात आज रविवारी दिनाक ०६ रोजी दिवसभरात मिळालेल्या माहिती नुसार ०७ कोरोना सक्रिय रुग्ण मिळाले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.कुडाळ मधील सळगाव येथे ०१ ,रंबांबुळी ०१ तर कुपवडे ०१, ओरोस ०१, कुडाळ शहर ०२असे कोरोना सक्रिय रुग्ण ०७ आढळून आले आहेत.तालुक्यात एकूण ५०२ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ४८८ कंटेन्मेट झोन पूर्ण झालेत तर सध्या १४ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत.तालुक्यात एकूण रुग्ण १२५२ तर बरे झालेले रुग्ण ११५० आणि सक्रिय रुग्ण ६१,स्थलांतरीत ०२ आहेत.आतापर्यंत तालुक्यात ३९ रुग्ण दगावले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page