वेंगुर्ला /-

कोरोनाची आपत्ती कोणासाठी जीवघेणी ठरली आणि कोणासाठी कमाईची नवी संधी ठरली यावरचा वाद सुरु राहील. पण या निमित्ताने या आपत्तीने खरंच काही शिकवलं का? काय शिकवलं? आपण ते लक्षात ठेवून आचरणात आणणार आहोत का? की कोरोनामुळे मिळालेले धडे विसरुन पुन्हा जुन्याच रस्त्याने जाणार आहोत? या विषयावर व्यक्तीगत स्तरावरचे अनुभव मांडण्यासाठी ‘कोव्हीड १९ ने मला काय शिकवलं?’ किरात ट्रस्टतर्फे खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे.कोरोना महामारीने स्वतःच्या जीवनशैलीबाबतचे, आर्थिक स्तराबाबतचे, आरोग्याबाबतचे, कौटुंबिक वातावरणाबाबतचे संदर्भच या आपत्तीने बदलले आहेत. ज्यांना आपल्यातून कायमचं हिरावून घेतलं त्यांचं दुःख कधीच भरुन निघणार नाही. पण त्यांचा प्रवास थांबला आहे. तर आपला प्रवास सुरु ठेवायचा आहे. मग हा नवा प्रवास आपण कसा करणार आहोत? जगण्यासाठी अत्यावश्यक असणा-या गोष्टी आणि गरज नसलेल्या चैनीच्या गोष्टींचा फरक करुन आपण जाणीवपूर्वक काही गोष्टी व्यक्तिगत स्तरावर बदलू शकलो आहोत का? आदी मुद्दे या निबंधात येणे अपेक्षित आहेत.
या निबंध स्पर्धेसाठी सुमारे ७०० ते १००० शब्दमर्यादा ठेवण्यात आली असून यापेक्षा जास्त शब्द झाल्यास सदरचा निबंध हा स्पर्धेसाठी स्विकारला जाणार नाही. स्पर्धकांनी आपले निबंध ३१ डिसेंबर २०२० पर्यंत kirattrust@gmail.com या मेलवर युनिकोड फॉण्टमध्येच वर्ड फाईलमधून किवा फुलस्केपवर सर्व बाजूने पुरेसा समास सोडून एकाबाजूने लिहून तो द्वारा-संपादक, साप्ताहिक किरात, ६३/९ खर्डेकर रोड, वेंगुर्ला, ता. वेंगुर्ला, जि.सिधुदुर्ग-४१६५१६ या पत्त्यावर पाठवावा. पारितोषिक विजेते निबंध किरात साप्ताहिकातून प्रसिद्ध केले जातील. हस्तलिखिताची झेरॉक्स स्विकारली जाणार नाही. विजेत्या प्रथम तीन स्पर्धकांना २०००, १५०० व १००० तर उत्तेजनार्थ ५०० अशी रोख बक्षिसे दिली जातील. अधिक माहितीसाठी सीमा मराठे यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page