मालवण /-

शिवसेनेची विचारधारा, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे काम प्रत्येक शिवसेना पदाधिकाऱ्याने घराघरात पोहचवूया. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या विचारांच्या व्यक्ती सदस्य म्हणून नोंद करूया. आगामी सर्व निवडणुकात प्रत्येक केंद्रावर शिवसेना आघाडीवर राहिली पाहिजे. यासाठी सदस्य नोंदणी अभियानात मालवण तालुका आघाडीवर ठेवण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे आहे. असे प्रतिपादन शिवसेना मालवण तालुका निरीक्षक अतुल रावराणे यांनी मालवण येथे बोलताना व्यक्त केले.

शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ अतुल रावराणे व माजी जिप अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांच्या उपस्थितीत शिवसेना मालवण शाखा येथे करण्यात आला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, मंदार केणी, पंकज सादये, बाबी जोगी, उमेश मांजरेकर, बाळू नाटेकर, संदीप हडकर, सेजल परब, आकांक्षा शिरपुटे, सुनीता जाधव, तृप्ती मयेकर, पूनम चव्हाण, श्वेता सावंत, दीपा शिंदे, रश्मी परुळेकर, नंदा सारंग यासह अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

प्रत्येक केंद्रावर १५ क्रियाशील सदस्य बनवावे. त्यांनी १५ ते २० सदस्य नोंदणी करावी. प्रत्येक केंद्रावर ३५० सदस्य असतील तर कोणत्याही निवडणुकीत शिवसेनेला प्रत्येक केंद्रावर लीड मिळणारच. असा विश्वास संग्राम प्रभुगावकर यांनी व्यक्त करत मार्गदर्शन केले. संपूर्ण शहर, तालुक्यात १५ डिसेंबर पर्यत सदस्य नोंदणी अभियान सुरू राहणार असल्याचे हरी खोबरेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page