मालवण /-

मालवण तालुक्यातील कट्टा बाजारपेठ येथील वैभवी संदीप गुराम (वय २०) ही युवती बेपत्ता झाली आहे. याबात युवतीचा भाऊ करण गुराम यांने कट्टा पोलीस ठाण्यात बहीण बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.

करण यांने दिलेल्या तक्रारीनुसार, कट्टा बाजरपेठ येथे आई, वडील, बहीण वैभवी व मी राहतो. बहीण वैभवी कट्टा कॉलेज येथे टीवायबीकॉम मध्ये शिकत होती. तर टायपिंग क्लासलाही जात असे. २४ नोव्हेंबर ला सकाळी १० : ३० वाजता टायपिंग क्लासला जाते असे सांगून गेलेले वैभवी परत आलीच नाही. तिचा मोबाईलही बंद येत होती.
सर्वत्र शोध घेऊनही तिचा पत्ता लागू शकला नाही.

असे पोलीस ठाण्यात दिलेली तक्रारातीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार रुक्मांगद मुंडे, पोलीस नाईक सराफदार, पोलीस कॉन्स्टेबल पुटवाड हे अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page