वैभववाडी/-

लाॕकडाऊनच्या काळातील वीज बीले माफ करण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले होते.माञ आता ही बीलांची वसुली केली जात आहे.राज्य सरकारने जनतेची घोर फसवणूक केली आहे.याचा निषेध म्हणून तालुका भाजपच्यावतीने वीज वितरण कार्यालयासमोर वीज बीलांची होळी करण्यात आली.यावेळी महाविकास आघाडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी तालुक्यातील समस्यांवरुन वीज वितरणच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार करुन पदाधिका-यांनी चांगलेच धारेवर धरले.
कोरोनामुळे संपूर्ण देशभरामध्ये लॉक डाऊन करण्यात आले होते.या काळात अनेकांना आपला रोजगार धंदयावर पाणी सोडावे लागले.या काळात वीज ग्राहाकांना दामदुप्पट वीज बीले आकारण्यात आली होती.यावेळी लाॕकडाऊन काळातील वीज बीले माफ करण्याची मागणी राज्यातील जनतेकडून करण्यात आली होती.यावेळी राज्य सरकारने वीज बील माफ करण्याचे आश्वासन राज्यातील जनतेला दिले होते.माञ आता ऊर्जा मंञी नितीन राऊत यांनी वीज बील माफी दिली जाणार नाही.असे स्पष्ट केले आहे.त्यामुळे वीज ग्राहकांमध्ये संतापाची लाट आहे.
सरकारच्या या दुप्पटी भूमिकेचा वैभववाडी भाजपच्यावतीने वैभववाडी वीज वितरण कार्यालयासमोर वीज बीलांची होळी करुन निषेध करण्यात आला.यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष नासिर काझी, माजी सभापती भालचंद्र साठे,माजी बांधकाम सभापती दिलीप रावराणे, भाजप युवा मोर्चा प्रमुख किशोर दळवी, नगरसेवक संजय सावंत, संतोष माईनकर, अनंत फोंडके, प्रदीप नारकर, दाजी पाटणकर,संजय काडगे, शरद नारकर, सुनील भोगले, राजन तांबे आदी उपस्थित होते.
वीज बिलांची होळी करतानाच भाजपा पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या विरोधात घोषणबाजी केली. राज्य शासनाने जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मुख्यमंत्री व त्यांचे मंत्री केवळ घोषणबाजी करतात. फुकटची आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करण्याचे काम होत आहेत. असा आरोप यावेळी करण्यात आला.
त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री. सूर्यवंशी यांची भेट घेऊन तालुक्यातील वीज समस्या मांडल्या. वीज वितरणचे अधिकारी केवळ पाट्या टाकण्याचे काम करीत आहेत. लाईट चालू – बंद करणे व बिलांची जबरदस्ती वसुली करणे एवढेच काम हे अधिकारी करीत आहेत.त्यामुळे वीज ग्राहकांच्या समस्या तशाच राहिल्या आहेत.
ऊर्जा मंत्री राऊत यांनी वीज ग्राहकांचे मेळावे घेतल्याचे सांगत आहेत मात्र वैभववाडी मध्ये एकही ग्राहक मेळावा झाला नाही. राज्य शासनाने केलेल्या घोषणे प्रमाणे एकही उपक्रम येथील वीज वितरण कार्यालयाने राबविलेला नाही. तालुक्यात वीज ग्राहकांचे वॉट्सअप ग्रुप तयार करण्याबाबत शासनाने निर्देश दिले असताना तालुक्यात असा एकही ग्रुप झाला नाही. अशा परिस्थितीत अधिकारी काय काम करतात असा सवाल पदाधिकाऱ्यांनी केला. येथील अधिकारी कार्यालयावर हजरच राहत नसल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page