कातकरी महिला भगिनींना साडी भेट देवून अनोख्या पद्धतीने भाऊबीज साजरी..

वेंगुर्ला /-

सर्वत्र दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना भटक्या विमुक्ती जातीतील कातकरी समाजातील लोकांना फराळ व मिठाई तसेच महिलांना साडी भेट देवून अनोख्या पद्धतीने भाऊबीज साजरी करुन भाजपा – वेंगुर्लेने समाजापुढे एक वेगळा आदर्श घालून दिला.गेली ५ वर्षे सातत्याने भाजपा वेंगुर्ले च्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून जनमानसात एक चांगली प्रतीमा निर्माण केली आहे.वेगवेगळ्या समाजात लोकोपयोगी कार्यक्रम आयोजित करुन, समाजाचे आपण देणे लागतो ही भावना पक्षाविषयी तयार केली.वेंगुर्ले शहरातील कॅम्प येथील कातकरी वस्तीत जाऊन भाजपा कार्यकर्त्यांनी आपल्या घरुन आणलेला फराळ व मिठाई देण्यात आली.तसेच महिला भगिनींना साडी भेट देवून भाऊबीज करण्यात आली.यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, वेंगुर्ले न.प.नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, भाजपा वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर ,जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके, जिल्हा चिटनीस व नगरसेविका पुनम जाधव , महिला तालुकाध्यक्षा स्मिता दामले, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर,नगरसेवक प्रशांत आपटे,नगरसेविका साक्षी पेडणेकर,सोशल मिडीया प्रमुख व परबवाडा सरपंच पपु परब, युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर,अल्पसंख्याक सेलचे रफिक शेख,महिला मोर्चा च्या कीर्ती मंगल भगत – वृंदा गवंडळकर – राधा सावंत, पुंडलिक हळदणकर,शरद मेस्त्री , महेंद्र घाडी आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अर्जुन पवार,राजु पवार , नितीन पवार,बाबी पवार, राज पवार, ध्रुपदा पवार, अंकुश निकम, अजय निकम, सुरेश पवार,चंदु पवार,शिवाजी पवार, काशीराम पवार,मोहन पवार, विक्रम निकम,जयराम पवार, उमेश निकम,विश्वास निकम, प्रकाश पवार आदी कातकरी समाजाचे लोक उपस्थित होते.यावेळी १८ महिलांना भाऊबीज भेट म्हणून साड्या देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page