वेंगुर्ला /-
पुनमच्या लहानपणी दिवाळी म्हणजे पोटभर गुळाचे पोहे, तिखट पाहे,काळ्या वाटाण्याची झणाझवीत उसळ आणि उकडलोली रताळी इतक खाल्स कीझाली दिवाळी पण काय मजा होती त्यात.नरकचतुर्दशीला पहाटे कडाक्याच्या थंडीत उठायचे तुळशीकडे कारीट फोडून जणूत्या नरकासुराला अंगट्याने चिरडायचे. नंतर खोबरेलतेलात उटण घालून अभंमस्नान करायच त्या नंतर सकाळीच डोंगरावर जाऊन सात्वीन ची साल आणून त्याचा कडू.. कडू.. रस प्यायचा रस गायू नये म्हणून आम्ही जोरात पळून- धावून फेरफटका मारून यायचो त्यानंतर वर उल्लेखलेला घरगुती फराळ पोटर खायचा मग उरखलेला पोट भर फराळ खाऊन वाड्यातील सर्व मुले,विटी-दं|डू ,लगोरी, खेळ खेळायचो मग जमिनीपर्यंत आलेल्या पायररीच्या आंब्यावर शिरकेंडी सूर-पारंब्या खेळायचो दिवाळी साठी आणलेल्या आकाश कंदिलच्या फोलिचे कंदील बनवून झाले की राहिलेल्या रंगीत फोलिचे पतंग बनविणे आणि ते उच..उंच.. आकाशात चिखलात धावत उडविणे हे उद्दोग करायचे आणि पतंग उडवून झाले की दिवस संपला,असा दिवसभरात उपक्रम चालायचा.नाहीतर आताची मुले नुसती मोबाईल गेम खेळत नाहीतर पूर्णपणे मोबाईल मद्धेच असतात.सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा. ही दिवाळी सर्वांना सुख,समृद्धी आणि भरभराटीची जाओ हीच ईश्वर चरणी एक प्रार्थना.
माजी शिक्षक श्री.आनंद पेडणेकर पेडणेकर, मु. पो.वेंगुर्ला आडरी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page