सिंधुदुर्ग /-

भहूचर्चित असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंजूर असलेले नियोजित शासकीय मेडिकल कॉलेज झाराप येथे होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी आत्ताच याची घोषणा केली आहे. झाराप सरपंच स्वाती तेंडोलकर, राजू तेंडोलकर, ग्रामसेवक श्रद्धा आडेलकर, गटविकास अधिकारी वर्ग ब चे श्री भोई यांनी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन ग्राम पंचायतिचा नाहरकत दाखला व मेडिकल कॉलेज होण्यासंबंधीची मागणी केली. झाराप येथील 25 एकर जागा शासनाची असून दोन दिवसापूर्वी खासदार विनायक राऊत यांनी झाराप येथे हे मेडिकल कॉलेज होण्याचा सुतोवाच दिला होता. झाराप-पत्रादेवी महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाणी हे मेडिकल कॉलेज होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच मध्यवर्ती ठिकाण असल्यान याचा जिल्हावासियांना फायदा होणार असून गोवा-कोल्हापूर, मुंबईवर आता अवलंबून राहण्याची आवश्यकता राहणार नाही आहे. तर नियोजित असलेली ओरोस येथील जागा वनसंज्ञेखाली येत असल्याने ती जागा रद्द करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,विकास कुडाळकर, रुपेश पावसकर, संजय भोगटे, सुनील डूबळे आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page