नोबल कम्प्युटर एज्युकेशनच्या विविध दालनाचा शुभारंभ..

संगणक क्षेत्रातील युवा उद्योजक प्रणय तेली व त्यांच्या टीमची संगणक क्षेत्रातील कामगिरी सर्वानाच प्रेरणा देणारी आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी आज नोबल कम्प्युटर एज्युकेशनच्या विविध दालनाच्या शुभारंभ प्रसंगी केले. कुडाळ येथील युवा उद्योजक प्रणय तेली व सई तेली या दाम्पत्यांनी स्वमालकीच्या हिंदू कॉलनी येथील जागेत सुरू केलेल्या नोबल कम्प्युटर एज्युकेशन विविध दालनाचा शुभारंभ उद्योजिका व मार्गदर्शक नीता प्रभू व उद्योजक विजय प्रभू यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ऍड संग्राम देसाई, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, कुडाळ हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक का. आ. सामंत, अरविंद शिरसाट, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उद्योजक शशी चव्हाण, गजानन कांदळगावकर, सचिन मदने अमोल शिरसाट संजय भोगटे संध्या तेरसे प्रसाद तेरसे धीरज परब प्रभाकर तेली सई तेली, सर्वेश वर्दम, प्रसाद पडते, आनंद शिरसाट, केदार सामंत, विशाल देसाई, राजन बोभाटे, गौरेश तेली, ऋषिकेश तेली, विघ्नेश खांडेकर, प्रिया पार्सेकर, किरण मिठबावकर, दत्ताराम चव्हाण, शिल्पा मठकर, प्रियांका चिरमुले, क्रांती बांबूळकर, फॅलमिया डिसोझा उपस्थित होते. नगराध्यक्ष तेली म्हणाले, युवा उद्योजक प्रणय तेली यांची अद्ययावत संगणक क्षेत्रातील भरारी ही येथील युवा वर्गासाठी निश्चितच प्रेरणा देणारी आहे संगणक क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या नोबलने सिंधुदुर्ग जिल्ह्यासह बिहार राज्यातही आपले नाव कोरले आहे. १२ वर्षे या क्षेत्रात वाटचाल करताना कुडाळसारख्या ग्रामीण भागात हा व्यवसाय सुरू करून उत्तुंग भरारी घेऊन सातत्य टिकविण्याची किमया तेली व त्यांच्या टीमने करून दाखविली. . अरविंद शिरसाट यांनी उद्योजक प्रणय तेली यांची यशोगाथा आजच्या युवकांसाठी निश्चितच प्रेरणा देणारी आहे असे सांगितले. नोबलचे संचालक प्रणय तेली म्हणाले, संगणक क्षेत्रात वाटचाल करण्यासाठी नीता प्रभू, विजय प्रभू या दाम्पत्याच्या मिळालेल्या मार्गदर्शनामुळे मी या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page