कुडाळ /-

दिवाळी सुट्टीबाबत बाबत संभ्रमावस्था कायम मात्र राज्य संघटना दिवाळी सुट्टी बाबत संभ्रमावस्था दूर करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री महोदया मा.वर्षाताई गायकवाड यांची भेट घेवून सुट्टी बाबत चर्चा करणार अशी माहिती त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य अध्यक्ष मा. उदयजी शिंदे यांनी सांगितले.

राज्यभरात अनेक शिक्षक परजिल्ह्यात काम करतात.गेले वर्षभर ते आपल्या गावी गेले नाहीत. अनेकांच्या आई वडील गंभीर आजारी आहेत.कुटुंबीयांना भेटलेले नाहीत. काही महिला आपल्या कुटुंबीयापासून शेकडो मैल दूर आहेत.अशा परिस्थितीत पाच दिवसाच्या सुट्टीत हे शिक्षक आपल्या गावी जावू शकतील काय? आणि गेलेच तर एक दिवस तरी कुटुंबीयांसमवेत वेळ घालु शकतील काय? काही लोक तर दोन दिवसाच्या प्रवासाने सुद्धा घरी पोचणार नाहीत.खर्चाचा हिशोब घातला तर तेही गणित जुळणार नाही.सहा हजार घेणारे शिक्षक दोन वेळच जेवण, भाड सुद्धा भागवू शकत नाहीत ते पाच दिवसासाठी जाण्याचं धाडस करतील काय .याचाही विचार होणे आवश्यक आहे.

शिक्षक घरी बसून नाही आहेत. शिक्षक शाळेत जावून शाळेचं काम करीत आहेत. स्वाध्याय,उपक्रम तयार करून विद्यार्थ्यांना देत आहेत.कोरोनाची ड्युटी करत आहेत.पाच दिवसाच्या सुट्टीत , घरी जाता येणार नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. दिवाळी तर साजरी होणार नाहीच.मात्र दिवाळी सारख्या सणासुदीला शिक्षकांच्या ,कर्मचाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडणार आहे. त्यामुळे पाच दिवस ऑनलाईन काम बंद ठेवा.आणि सुट्टीचे उर्वरित दिवस स्वगृही राहून ऑनलाईन काम करण्यास मुभा द्या.जिल्हा परिषदांना केलेल्या सुट्ट्यांच्या नियोजनाप्रमाणे सुट्ट्या उपभोगू द्या अशी मागणी संघटनेचे राज्याध्यक्ष उदयजी शिंदे हे शालेय शिक्षण मंत्री महोदयांना भेटून करणार आहेत.असे संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री.राजन कोरगांवकर यांनी
महाराष्ट्र राज्य प्राथ शिक्षक समिती यांच्या वतीने आपल्या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page