मालवण /-

सभा ऑफलाईन स्वरूपात सभागृहातच झाली पाहिजे. ऑनलाईन सभेचा अजेंडा आम्ही सदस्य स्वीकारणार नाही. अशी आक्रमक भूमिका घेत पंचायत समिती गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी पंचायत समिती प्रशासनाने पाठवलेला ऑनलाईन सभेचा नोटीस अजेंडा स्वीकारण्यास ठाम नकार दिला.

ग्रामीण जनतेचे प्रश्न, समस्या मांडण्यासाठी पंचायत समिती सभागृह हे व्यासपीठ आहे. कोरोना वाढत्या संक्रमण काळात ऑनलाईन सभा झाल्या. मात्र आता सर्व खुले होत आहे. शासन स्तरावर अनेक बैठक होत आहेत. अश्या स्थितीत ग्रामीण भागातील अपुरी इंटरनेट सुविधा लक्षात घेता ऑनलाईन सभा नको ही मागणी सुनील घाडीगांवकर यांनी गटविकास अधिकारी जे पी जाधव यांच्याकडे १० दिवसांपूर्वी केली होती. त्यावेळी ऑफलाईन सभा घेण्याबाबत गटविकास अधिकारी यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली होती.

असे असताना १९ नोव्हेंबर रोजी होणारी पंचायत समिती सभा ऑनलाईन स्वरूपात असल्याबाबत त्या सभेच्या अजेंडा नोटीस पंचायत समिती प्रशासनाने काढल्या. गटनेते सुनील घाडीगांवकर यांना ही सभा नोटीस देण्यात आली असता त्यांनी नोटीस स्वीकारण्यास नकार दिला.

सभापती व गटविकास अधिकारी यांचे याबाबत लक्ष वेधून पंचायत समिती सभा ऑफलाईन धर्तीवर सभागृहात व्हावी ही भूमिका मांडली. अनेक प्रशासकीय कार्यालयातील सभा ऑफलाईन होतात त्याच धर्तीवर कोरोना खबरदारी नियम पाळून सभा व्हावी. तरच आम्ही उपस्थित राहू ऑनलाईन सभेला आम्ही सदस्य हजर राहणार नाही. अशी भूमिका घाडीगांवकर यांनी घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page