वेंगुर्ला /-

गाव पातळीवर महसूल, पोलिस प्रशासन आणि ग्रामस्थ यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलिस पाटील कार्यरत असतात. गावातील तंटे मिटवुन गावात शांतता व सलोखा ठेवण्याचे काम पोलिस पाटील करत असतात.कोरोना काळात कोणत्याही मार्गदर्शक सुचना व सुरक्षा नसतानाही आपला जिव धोक्यात घालून दिवस – रात्र काम पोलिस पाटीलांनी केले.परंतु त्या कामाची दखल ना शासनकर्त्यांनी केली वा कुठल्या राजकीय पक्षाने केली.कोरोना काळात शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी काम नाकारले,परंतु पोलिस पाटीलांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले म्हणूनच भाजपा वेंगुर्ले च्या वतीने पोलिस पाटीलांना “कोरोना योद्धा” म्हणून गौरवण्यात येत असल्याचे प्रतिपादन भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले.तसेच पोलिस पाटील हे शासकीय कर्मचारी नसल्याने त्यांना फक्त मासिक मानधन मिळते. परंतु पोलिस पाटीलांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, तो लाभ मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर भाजपा मार्फत प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच पोलिस पाटीलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या सदैव पाठीशी राहण्याचे अभिवचन जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिले.यावेळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,नगरसेवक धर्मराज कांबळी महिला तालुका अध्यक्षा- माजी उपसभापतीस्मिता दामले,जि. का.का.सदस्य साईप्रसाद नाईक,शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, सोमनाथ टोमके, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर, युवा मोर्चा चे संदीप पाटील व प्रणव वायंगणकर, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर व तालुकाध्यक्ष बाबा नाईक, बुथप्रमुख शेखर काणेकर व दादा तांडेल उपस्थित होते.
यावेळी पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष मधुसुदन मेस्त्री, आजगाव पोलिस पाटील निकीता पोखरे, आसोली – निलेश पोळजी, पाल – ॠतीका नाईक,अणसुर – बापु गावडे, मोचेमाड – आश्विनी खवणेकर, उभादांडा- विजय नार्वेकर, तुळस – प्रकाश तुळसकर, आडेली – संजना होडावडेकर, दाभोली- जनार्दन पेडणेकर, खानोली – धोंडु खानोलकर आदी पोलिस पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page